Vidhan Sabha 2019 : देशमुख कुटुंबियांनी बाभळगावात बजावला मतदानाचा हक्क

Vidhan Sabha 2019 : देशमुख कुटुंबियांनी बाभळगावात बजावला मतदानाचा हक्क

लातूर : दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी सोमवारी (ता. 21) मूळगाव बाभळगाव (ता. लातूर) येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. विलासरावांचे अमित आणि धीरज हे दोन सुपूत्र यंदा विधानसभा निवडणूक रिंगणात आहेत. 

आमदार अमित हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा तर धीरज हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. बाभळगावात सकाळी पाऊस सुरू असतानाच सर्व कुटुंबियांनी केंद्रावर येऊन मतदान केले. या वेळी माजीमंत्री दिलीपराव देशमुख, वैशालीताई देशमुख, आमदार अमित देशमुख, आदिती देशमुख, अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री जेनेलिया देशमुख, धीरज देशमुख व  दीपशिखा देशमुख यांनी मतदान केले व केंद्राबाहेर येऊन मतदान केल्याची पोज छायाचित्रकारांना दिली. यासोबत अमित व धिरज यांच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com