नांदेडमध्ये जप्त केलेली एक लाखाची दारू नष्ट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या 25 गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी देशी व विदेशी अशी एक लाख एक हजार 337 रुपयांची दारू जप्त केली होती. जप्त केलेल्या दारूला नष्ट करण्यासाठी न्यायालयाचा आदेश मिळवून पीआय सुरवसे यांनी आज पोलिस ठाण्याच्या एका खोलीत जप्त केलेला हा दारूचा साठा पंचांसमक्ष नष्ट केला.

नांदेड : शिवाजीनगर पोलिस ठाण्याअंतर्गत विविध 25 गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली देशी दारू व विदेशी दारू न्यायालयाच्या आदेशावरून नष्ट करण्यात आली. यावेळी शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे आणि उत्पादन शुल्कचे निरीक्षक चिलवंतकर उपस्थित होते.

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या 25 गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी देशी व विदेशी अशी एक लाख एक हजार 337 रुपयांची दारू जप्त केली होती. जप्त केलेल्या दारूला नष्ट करण्यासाठी न्यायालयाचा आदेश मिळवून पीआय सुरवसे यांनी आज पोलिस ठाण्याच्या एका खोलीत जप्त केलेला हा दारूचा साठा पंचांसमक्ष नष्ट केला.

Web Title: Destroyed a Lakh of Rupees liquor in Nanded

टॅग्स