दोन एटीएम फोडून 16 लाख लंपास, एटीएम फोडणारी टोळी सक्रीय

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 27 जून 2018

नांदेड : भाग्यनगर ठाण्यच्या हद्दीतील दोन एटीएमला चोरट्यांच्या टोळीने लक्ष्य केले. या एटीएममधून तब्बल 16 लाख रूपयांवर चोरट्यांनी हात साफ केला. ही घटना बुधवारी (ता. 26) पहाटे एकच्या सुमारास घडली. 

नांदेड : भाग्यनगर ठाण्यच्या हद्दीतील दोन एटीएमला चोरट्यांच्या टोळीने लक्ष्य केले. या एटीएममधून तब्बल 16 लाख रूपयांवर चोरट्यांनी हात साफ केला. ही घटना बुधवारी (ता. 26) पहाटे एकच्या सुमारास घडली. 

या घटनेवरून शहरातील एटीएम किती सुरक्षित आहेत, सुरक्षेसंदर्भात बॅंक प्रशासन किती गंभीर आहेत, हे उघडकीस आले आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा सर्व प्रकार संपेपर्यंत शहर पोलिस दलातील एकही गस्तीवाहन या परिसरातून फिरकले नाही, हे विशेष. ही घटना उघडकीस येताच बुधवारी सकाळी एकच खळबळ उडाली. पोलिसांनी एसबीआय बॅंकेचे व्यवस्थापक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. रात्री शहारत संततधार पावसाचा फायदा या चोरट्यांनी घेताल आहे. गॅस कटरचा वापर करून त्यांनी हे एटीएम फोडले आहेत. 

Web Title: destroys 2 atm and stole 16 lakhs in nanded