हिंगोलीतील ३० तीर्थस्थळांचा होणार विकास

photo
photo

हिंगोली: जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील ३० तीर्थस्थळांच्या विकास कामांसाठी तीन कोटी ८० लाखांचा मंजूर झाला आहे. त्यामुळे आता तीर्थस्थळांचा विकास होणार असून भाविकांना सुविधा उपलब्ध होणार असून जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला तसे पत्र प्राप्त झाले आहे.

यामध्ये हिंगोली तालुक्यातील पांगरी येथील बाळसखा महाराज मंदिर परिसरात पेव्हरब्लॉक बसविणे पाच लाख, विद्युत पथदिवेसाठी पाच लाख, असा एकूण दहा लाखांचा निधी मंजूर झाला आहे. खांबाळा येथील राम मंदिरात पेव्हर ब्लॉक बसविणे चार लाख, विद्युत पथदिवेसाठी चार लाख, माळहिवरा येथील जागृत हनुमान मंदिर परिसरात पथदिवे बसविणे यासाठी पाच लाख, सावा येथील पंचमुखी महादेव संस्थान परिसरात पथदिवे बसविणे यासाठी एक लाख ४६ हजार, तसेच इंचा येथे नागसेन बौद्ध विहार परिसरात पथदिवे बसविणे एक लाख ४६ हजार, असा एकूण २५ लाख ९२ हजार रुपयांचा निधी तालुक्यातील तीर्थस्थळांचा विकास करण्यासाठी मंजूर झाला आहे.

पथदिवे, पेव्हर ब्लॉक, सभामंडप कामांचा समावेश

या शिवाय कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथील पवित्रेश्वर मंदिर परिसराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बांधकामासाठी २७. ५०, पथदिवे बसविणे ७. ५० लाख, बोल्‍डा येथील मिस्कीन शाहवली दर्गा परिसरात विद्युत पथदिवे बसविण्यासाठी सात लाख ५० हजार ,कृष्णापूर येथील महादेव मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे नऊ लाख, दाती येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉकसाठी नऊ लाख, तर तारकुंपण, गेटसाठी पाच लाख, विद्युत पथदिव्यांसाठी पाच लाख, शेवाळा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवेसाठी पाच लाख, कुर्तडी येथील महादेव (भुवनेश्वर) मंदिर सभामंडप बांधकाम टीनशेडसाठी तीस लाख, दांडेगाव येथील क्षेत्र महादेव मंदिर संस्थान येथे पार्किंग व्यवस्था, आरसीसी नाली बांधकामासाठी बारा लाख, तर डोंगरकडा येथील जटाशंकर मंदिर परिसरात पथदिवे बसविण्यासाठी तीन लाख, असा एकूण ९६ लाख ५० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

भक्तनिवास , रस्ता बांधकामे होणार

याचप्रमाणे सेनगाव तालुक्यातील तीर्थस्थळांसाठी यामध्ये पुसेगाव येथील श्री १००८ संभवनाथ व पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर परिसरात पथदिवे बसविणे दोन लाख, भक्त निवास उर्वरित बांधकाम १९ लाख, पेव्हर ब्लॉक बसविणे दहा लाख, वाहनतळ बांधकाम सात लाख, तसेच माझोड येथील देवी मंदिर परिसरात पथदिवे बसविणे पाच लाख, पानकन्हेरगाव येथील श्रीक्षेत्र माणकेश्वर देवस्थान मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक पाच लाख, पथदिव्यांसाठी पाच लाख, जवळा बुद्रुक येथील राम हनुमान मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉकसाठी पाच लाख, ताकतोडा येथील नारायण गिरी बाबा संस्थान याठिकाणी भक्त निवास, सभागृहाचे उर्वरित बांधकाम करणे १५ लाख, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे २५ लाख, बरडा पिंपरी येथील महेश्वर महारुद्र सरस्वती तीर्थ संस्थान येथे सभा मंडप बांधकाम करण्यासाठी २० लाख, तर हाताळा येथील महादेव गजानन महाराज संस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामासाठी व पेव्हर ब्लॉकसाठी दहा लाख, सभामंडपाचे अंतर्गत विद्युतीकरणासाठी, पथदिवे यासाठी सात लाख रुपये.

घाट, पायऱ्याच्या कामाचा समावेश

तसेच औंढा तालुक्यातील चार देवस्थानासाठी ४६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये सारंगवाडी येथील सारंगस्वामी मठ परिसरात प्रसादालय, संरक्षण भिंत, पेव्हर ब्लॉकसाठी १४ लाख, मेथा येथील गणपती मंदिर भक्त निवास बांधकामासाठी २० लाख, बेरुळा येथील अमरेश्वर महादेव संस्थान परिसरात घाट व पायऱ्यांचे बांधकाम करण्यासाठी सात लाख, तर बाराशिव येथील हनुमान मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

बाह्य विद्युतीकरण, पथदिवे बसविले जाणार

या शिवाय वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील रोकडेश्वर मंदिर येथे भक्त निवासमधील अंतर्गत विद्युतीकरण, बाह्य विद्युतीकरणासाठी पाच लाख, सोमठाणा येथील खोडकेश्वर मंदिर परिसरात पथदिवे बसविणे पाच लाख, आरळ येथील अन्नपूर्णा देवी मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक आठ लाख, सोलर पथदिव्यांसाठी पाच लाख, नहाद येथील मोहनानंद महाराज मंदिर परिसरात विद्युत पथदिवे बसविणे पाच लाख, टेभूर्णी येथील संत येशूबाबा महाराज मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉकसाठी पाच लाख, आडगाव रंजेबुवा येथील ओंकारेश्वर महादेव मंदिर परिसरात पथदिवे ६.९०, पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ३. १० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या सभेत होणार निधी वितरीत

जिल्ह्यातील एकूण तीस गावांतील तीर्थस्थळांचा विकास करण्यासाठी तीन कोटी ८० लाख ९२ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. निधी मंजूर झाला असला तरी हा निधी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तालुकानिहाय वितरित केला जाणार आहे. त्यामुळे त्यानंतरच विकास कामांना गती येणार आहे. यामुळे भाविकांना सुविधा उपलब्ध होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com