मुख्यमंत्री सरकार नव्हे तर, फक्त कार चालवतात : फडणवीस

या सरकारला केवळ चालू असलेल्या कामांना स्थगिती आणि भाजप काळातील योजनांचं उद्घाटन एवढंच करता येतं.
fadanvis thackeray
fadanvis thackeray

जालना : मराठवाड्यातील भीषण पाणी टंचाईबाबत (Water Crises) भाजपने जोरदार आक्रमम भूमिका घेतली असून, औरंगाबाद पाठोपाठ आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जालन्यात पाणी प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री केवळ कार चालवातत आणि देव सरकार चालवतं असून राज्यातील सर्व कारभार हा ईश्वर भरोसे सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले. ते जालन्यात आयोजित जलआक्रोश मोर्चा (Jal Akrosh Morcha) दरम्यान आयोजित सभेत बोलत होते. (Devendra Fadanvis Attack On CM Uddhav Thackeray)

fadanvis thackeray
औरंगाबाद पाणी प्रश्न : मोदींचे नाव घेत मुख्यमंत्र्यांसमोरच राज्यपाल म्हणाले...

फडणवीस म्हणाले की, भाजपच्या काळात ज्या काही योजना पाणी समस्या सोडवण्यासाठी आखण्यात आल्या होत्या त्या गेल्या अडीच वर्षात तुसभरही पुढे सरकलेल्या नाही. भाजप सरकार सत्तेतून गेलं आणि नवीन सरकारमध्ये सर्व योजना आणि विकास ठप्प झाल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. या सरकारला केवळ एकच काम करता येते आणि ते म्हणजे चालू असलेल्या कामांना स्थगिती आणि भाजप काळातील योजनांचं उद्घाटन. हे स्वतः काही करत नाही आणि भाजपनं योजलेलं पूर्ण होऊ देत नाही.

fadanvis thackeray
Aurangabad News | सिडको- हडकोचा पाणी प्रश्न पेटला, भाजपने केले आंदोलन

आम्ही जनतेचं सेवक असून, सामान्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितले. जिथे जिथे जलआक्रोश आहे तिथे तिथे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे मैदानात उभी असल्याचे ते म्हणाले. जनतेच्या आक्रोशाची जे दखल घेत नाही त्यांना जनता जागेवर ठेवत नाही असा इशारा त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिला.

आजचा हा मार्चा झोपलेल्या राज्य सरकारला जागं करण्यासाठी असून, जनतेनं तुम्हाला खुर्च्या मोडण्याकरता आणि सिंहासन मिरवण्याकरता दिलेलं नाही. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवणार नसाल तर, सिंहासनावर बसवण्याचा तुम्हाला कोणताच अधिकार नाही हेच सांगण्याकरता आजचा मोर्चा असल्याचं फडणवीस म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com