लाव रे तो व्हिडिओ, राज ठाकरेंची स्टाईल कॉपी करणार देवेंद्र फडणवीस

पूजा विचारे
Tuesday, 20 October 2020

लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत राज ठाकरेंनी निवडणुकीच्या प्रचार सभेत एकच गोंधळ उडवून दिला होता. आता राज ठाकरे यांची हीच स्टाईल भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस वापरणार आहेत.

उस्मानाबादः  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक स्टाईल भलतीच व्हायरल झाली होती. लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत राज ठाकरेंनी निवडणुकीच्या प्रचार सभेत एकच गोंधळ उडवून दिला होता. आता राज ठाकरे यांची हीच स्टाईल भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस वापरणार आहेत. 

देवेंद्र फडणवीस आज उस्मानाबादेच्या दौऱ्यावर आहेत. उस्मानाबादमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे त्या भागातील पाहणी करण्यासाठी ते तिथे पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताहेत. महाराष्ट्र राज्यावर अस्मानी संकट कोसळले आहे.  आता फडणवीस हे राज ठाकरेंची स्टाईल कॉपी करत महाविकास आघाडी सरकारवर टीका करणार आहेत. 

अधिक वाचाः  ठाणे पालिकेच्या कोविड रुग्णालयात मुन्ना भाई MBBS,अर्धशिक्षित डॉक्टरांचा सुळसुळाट

सोमवारी रात्री उशिरा सुद्धा फडणवीस यांनी पाहणी केली होती. सत्तेत येण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी २५ हजार रुपये आणि बागायतीसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदतीचीही मागणी केली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे जुने व्हिडिओ दाखवून राज्य सरकारला शेतकऱ्यांना त्यांची मदत करण्यासाठी काय जबाबदारी घेतली होती त्याची आठवण करुन देतील.

Devendra Fadnavis criticize Mahavikas Aghadi government style Raj Thackeray Laav Re To Video


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis criticize Mahavikas Aghadi government style Raj Thackeray Laav Re To Video