देवलाल राजपूत यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड 

Devlal Rajput elected as Deputy District President
Devlal Rajput elected as Deputy District President

फुलंब्री : भारतीय जनता युवा मोर्च्याच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी देवलाल कचरूसिंग राजपूत यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या आदेशाने महानगरपालिकेचे उपमहापौर तथा भारतीय जनता युवा मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी देवलाल राजपूत यांना नियुक्तीपत्र दिले आहे.

सदरील नियुक्ती पत्रात म्हंटले आहे कि, पक्षाच्या बांधणीमध्ये सामाजिक तथा राजकीय इतिहास क्षेत्रात उल्लेखनीय काम करून पक्ष संघटन मंजबूत करावे. जास्तीत जास्त लोकांची पक्षाशी जोडणी करावी. या नियुक्ती बद्दल माजी मंत्री डॉ. नामदेवराव गाडेकर, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, उपनगराध्यक्ष इंदुबाई मिसाळ, जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण, सभापती सर्जेराव मेटे, उपसभापती एकनाथ धटिंग, विकास गायकवाड, योगेश मिसाळ, रोषण अवसरमल, राजेंद्र डकले, आप्पाराव काकडे, नाथा काकडे, सविता फुके,आदींनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com