धामना धरणाच्या सांडव्याला गळती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

यंदा जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळाच्या झळा सहन केलेल्या भोकरदन तालुक्‍यात पावसाने मात्र चांगलाच हात दिला आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. दोन) झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील शेलूद येथील धामना धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला गळती लागली. त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या शेलूद, लेहा गावांतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जालना - यंदा जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळाच्या झळा सहन केलेल्या भोकरदन तालुक्‍यात पावसाने मात्र चांगलाच हात दिला आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. दोन) झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील शेलूद येथील धामना धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला गळती लागली. त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या शेलूद, लेहा गावांतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बुधवारी धरणाला भेट देत पाहणी केली. प्रकल्प सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. सुरक्षेचा उपाय म्हणून धरण क्षेत्रातील ग्रामस्थांना अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या. 

जिल्ह्यात बुधवारी (ता.३) सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासांत सरासरी २२.५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पाच मंडळांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. यात जालना (८६ मिलिमीटर), राजूर (८० मिलिमीटर), अन्वा (७० मिलिमीटर), भोकरदन (७८ मिलिमीटर), जाफराबाद (८५ मिलिमीटर) या पाच महसुली मंडळांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhamana Dam Water Leakage