नांदेडच्या बावरीनगरमध्ये धम्मपरिषद 

bhante
bhante

नांदेड : माणसाचे आचरण शुद्ध व्हावे, यासाठी बौद्ध धम्म परिषदांचे सुयोग्य  आयोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पूज्य भदंत धम्मसेवक महाथेरो यांनी केले.

नांदेड शहरापासून दहा किलोमिटर अंतरावर असलेल्या महाविहार बावरीनगर दाभड (ता. अर्धापूर) नांदेड येथील महाविहारात धम्मदेसना देताना धम्मसेवक महाथेरो बोलत होते. येत्या पौष पौर्णिमेला ता. १० आणि ता. ११ जानेवारी २०२० रोजी महाविहार बावरीनगर दाभड- नांदेड येथे ३३ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद होणार आहे. परिषदेच्या पूर्वतयारी संदर्भात भदंत धम्मसेवकजी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याप्रसंगी पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो, भदन्त पंय्यारत्न, भदंत शीलरत्न, भदंत संघपाल तसेच महाविहार बावरीनगर दाभड धम्मपरिषद येथे मुख्य संयोजक उपस्थित डॉक्टर एस. पी. गायकवाड यांची उपस्थिती होती. 

धम्म परिषदेच्या पूर्व तयारीची बैठक

पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांनी प्रारंभी महाविहार बावरीनगर दाभड येथे मागील 32 वर्षांपासून घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदांच्या आयोजनाचा आढावा घेतला. 
या प्रसंगी धम्मदेसना देताना पूज्य भदंत धम्मसेवक महाथेरो यांनी बौद्ध धम्म परिषदांमधून शुद्ध स्वरूपात धम्माचरणाचा उपदेश व्हावा, अशी भूमिका मांडली. महाविहार बावरीनगर परिषदेमध्ये गेली 32 वर्षे हा संदेश पोहोचवला जात आहे. त्याचे अनुसरण महाराष्ट्रात तसेच देशात अनेक भागात होत आहे, याबद्दल पूज्य भदंत धम्मसेवकजी महाथेरो यांनी समाधान व्यक्त केले.

उपस्थित धम्म बांधव

महाविहार बावरीनगरच्या 33 व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या पूर्वतयारी बैठकीला प्रा. बी. एम. वाघमारे, इंजिनीयर डी. डी. भालेराव, इंजिनीयर यशवंत गच्‍चे, एस. टी. पंडीत, तोलाजी अटकोरे, लक्ष्मण गर्जे, मिलिंद भालेराव, ॲड. डी. एफ. हरदडकर, सी. एम. रावणगावकर, चांगुणाबाई गोणारकर, चंद्रभागाबाई वाठोरे,  प्रा. नरवाडे, प्रा. पंडित सोनाळे, श्री. पालीमकर, अनिल उबाळे, विकास कदम, आनंद भोरगे आदींची उपस्थिती होती.

संयोजन समितीचे आवाहन

दोन दिवशीय चालणाऱ्या या धम्म परिषदेला शेजारील राज्य कर्नाटक, तेलंगना, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश येथून उपासक व उपासिका मोठ्या संख्येने येत असतात. तसेच श्रीलंका व देशातील विविध भागातून धम्म प्रवचन करण्यासाठी मोठ्या संख्येने भन्तेगण येतात. तसेच दिवस व रात्री धम्म प्रवचन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौत्तम बुध्द यांच्या जिवनावर गितांचा सामना रंगत असतो. या धम्मपरिषदेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहतो. राज्याच्या पर्यटनस्थळापैकी हे एक पर्यटनस्थळ आहे. शासनाकडून या पर्यटन स्थळाचा विकास व्हावा यासाठी मोठा निधी देण्यात आला आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या सा परिषदेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com