परभणीत धनगर आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

गोमेवाकडी (ता.सेलू) : धनगर समाजास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात शासनस्तरावरुन विलंब होत असल्याने तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.12) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस अाली. दरम्यान त्या तरुणाने मोबाईलवर धनगर समाजाच्या अारक्षणासाठी मी जीव देत असल्याचा मॅसेज टाकला होता.

गोमेवाकडी ( ता.सेलू ) येथील योगेश राधाकिशन कारके (वय.20) या युवकाने राहत्या घरातील पत्राच्या आढुला पांढर्‍या रंगाच्या रूमालाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस अाली. मयत योगेश याने त्याच्या मोबाईलवरुन मी धनगर समाजासाठी जीव देत आहे, असा टेक्ट मेसेज लिहित तो बी. शिंदे यांच्या नंबरवर पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेटवर्कच्या कारणामुळे तो संदेश पुढे पोहचू शकला नाही, अशी माहिती घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी गेलेले सेलू पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी यांनी दिली.

मयत योगेश याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. असून घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डाॅ. नितिन काशीकर व बिट जमादार चौरे हे करित आहेत.

Web Title: For Dhanagar Reservation One youth Suicide