'गोपीनाथ मुंडेंचा वारसा सांगणाऱ्यांनी काहीच केले नाही' 

Dhananjay Munde
Dhananjay Munde

पाटोदा : या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत फसवणूक केली. त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळ काढून रद्द केले. एवढे होऊनही त्यांच्या नावाचा वारसा सांगणाऱ्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे मुंडेसाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार तर आम्हीच आहोत, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी (ता. 16) केले. 

पाटोदा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारार्थ आयोजित बूथ कमिटी बैठक व कार्यकर्ता मेळाव्यात मुंडे बोलत होते.

ते म्हणाले की, सध्याच्या खासदारांनी 25 कोटींपैकी केवळ सात कोटी निधीच खर्च केला असून, हा खालून उच्चांक आहे. या कसल्या दबंग खासदार आहेत? आमच्या दोन्ही भगिनींना सर्वसामान्यांच्या समस्या कळत नाहीत. पाच वर्षांत काम न करता दसरा मेळाव्यानिमित्त सावरगावात येऊन बाबांचे नाव घ्यायचे, पुन्हा भावनिक राजकारण करून लोकांची फसवणूक करायची, हेच काम त्या करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com