शिवसेना-भाजप दोघे कौरवच : धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

उस्मानाबाद : राज्यातील महापालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला महाभारताचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शिवसेना-भाजप यांच्यातील युती तुटल्यानंतर सुरू झालेल्या या महाभारतात आता राष्ट्रवादीने दोन्ही पक्षांना कौरव ठरवत उडी घेतली आहे. भाजपने शिवसेनेवर हल्ला चढवतांना त्यांची तुलना कौरवांशी करत स्वःताला पांडव ठरवले होते. यावर विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्तेसाठी भांडणारे शिवसेना-भाजप हे दोघेही कौरवच असल्याची टीका केली आहे. 

निवडणुका आल्या की युती तोडायची, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायचे आणि निवडणुका झाल्या की पुन्हा गळ्यात गळे घालायचे हे यापूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत दिसले, आताही तसेच होणार. सेना-भाजप महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक करत आहेत, दोघांची करणी कौरवांसारखीच आहे. राज्याच्या विकासाच्या केवळ गप्पा मारल्या जात आहेत, हे भांडण विकासासाठीचे नाही तर सत्तेसाठीचे आहे असा जोरदार टोला देखील मुंडे यांनी लगावला. त्यामुळे या महाभारतात राष्ट्रवादी नेमकी कोणती भूमिका वठवणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

भाजप नेतृत्वाने दानवेंना थोपवले 
औरंगाबाद :
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या "संध्याकाळी आलेली लक्ष्मी स्वीकारा, राज्यात दुष्काळ नव्हता, आम्ही रडलो म्हणून केंद्राकडून निधी मिळाला, हजार, पाचशेच्या जुन्या नोटा असतील तर माझ्याकडे द्या मी बदलून देता' अशा अनेक वाचाळ वक्तव्यामुळे पक्ष अडचणीत आला. निवडणूक आयोगाने त्यांच्या विरुद्ध आचारसहिंता भंग केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल केला. आता पुन्हा हा अनुभव नको म्हणून भाजप नेतृत्वाने प्रदेशाध्यक्षांना मराठवाड्यातच थोपविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. 

मुंबईतील भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यापासून त्यांना दूर ठेवण्यात आल्यामुळे ही चर्चा जोर धरत आहे. दानवे यांच्या ग्रामीण ढंगातील भाषणांना मराठवाड्यात जरी टाळ्या मिळत असल्या तरी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यासारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रदेशाध्यक्षांनी केलेली एक चूक देखील महागात पडू शकते याची जाणीव झाल्यामुळेच भाजप ताकही फुंकून पीत असल्याचे बोलले जाते.

Web Title: Dhananjay Munde criticizes Shiv Sena and BJP