अबब...धनंजय मुंडेंचे परळीत भव्य स्वागत, पाच राज्यांची बँड पथके

धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी केरळहून आलेले बँड पथक.
धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी केरळहून आलेले बँड पथक.

बीड - लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या राजकीय वारसदार पंकजा मुंडे यांचा पराभव करणारे आणि राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्रीपदावर निवड झाल्याने धनंजय मुंडेंची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पाच राज्यातील बँड पथकांनी कला सादर केली.

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सत्कार सत्कार साेहळा आयाेजित करण्यात आला. या मिरवणुकीत आणि मुंडेंच्या स्वागताला समर्थक आणि संयोजकांनी पाच राज्यांतील बँड पथके आणली. पंजाब, राजस्थान, केरळ आदी राज्यातील पथकांनी परळीकरांचे लक्ष वेधून घेतले. 

सजविलेल्या उघड्या जीपमधून धनंजय मुंडेंसह नेते उपस्थितांना अभिवादन करत हाेते. समोर या पथकांसह पुणे, मुंबई या ठिकाणचे मुलींचे ढोल पथक आपली कला सादर करत हाेते. शहरात दहा ठिकाणी पाचशे ते सहाशे किलो वजनाचे फुलांचे हार क्रेनच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांना चढविण्यात आले. विशेष म्हणजे, शहरात सुवर्णालंकीत कमान देखील उभारली आहे. विद्युत रोषणाईने परळीचे रस्ते लखाखून गेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com