... म्हणून धनंजय मुंडे भिडले पोलिस अधिक्षकांशी!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

शरद पवार यांना झेड सुरक्षा असल्याने त्यांच्या सभेसाठी 'डी झोन' तयार करण्यात येतो. या डी झोनमध्ये कुणालाही प्रवेश देता येत नाही.

परभणी : निवडणूक, राजकीय नेते, कार्यकर्ते, पोलिस आणि वाद हे समीकरण काही नवं नाही. जसजसा निवडणूक प्रचाराचा रंग रंगात येत जातो, तसतसे राजकीय नेते आणि पोलिस प्रशासनात वाद-विवाद होण्याचे प्रसंगही घडतात. अशीच एक घटना गुरुवारी (ता.19) परभणीत घडली. 

- सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ

त्याचं झालं असं की, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी परभणीत दाखल झाली. या निमित्ताने श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि पक्षातील नेते मंडळी बसली होती.  

सभेच्या ठिकाणी असलेल्या 'डी झोन'मध्ये शिरलेल्या कार्यकर्त्यांना उठविण्याचा प्रयत्न केल्यावरून सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातच जुंपली. कार्यकर्त्यांना उठविण्यावरून दोघांमध्ये बराचवेळ बाचाबाची झाली. 

- चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ; कारागृहातील मुक्काम वाढला

Image may contain: 5 people

शरद पवार यांना झेड सुरक्षा असल्याने त्यांच्या सभेसाठी डी झोन तयार करण्यात येतो. या डी झोनमध्ये कुणालाही प्रवेश देता येत नाही; परंतु जसे शरद पवार सभेसाठी व्यासपीठावर आले. त्यांच्या मागे उभे असलेले शेकडो कार्यकर्ते 'डी' झोन मध्ये शिरले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी कार्यकर्त्यांना तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. 

पोलिस प्रशासन आपले कर्तव्य बचावत होती. मात्र, हा प्रकार पाहून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे व्यासपीठावरून खाली आले. त्यांनी कार्यकर्त्यांना बसू द्या असे सांगतिले; परंतु पोलिसांनी सुरक्षिततेसाठी त्यांना बाहेर जावेच लागेल, असे सांगितल्याने काही वेळ बगाटे आणि मुंढे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, त्यानंतरही अनेक कार्यकर्ते 'डी झोन' मध्येच बसून राहिले.

- पुणे : मदतीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde fights with police superintendent in Parbhani