आप्पा...तुमचाच वारसा चालवतो आहे- धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

'आप्पा... तुमचाच वारसा चालवतो आहे... संघर्षाचा, जन सामान्यांच्या कल्याणासाठी... सदैव तुमच्या आठवणीत. विनम्र अभिवादन'!

बीड: दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'आप्पा... तुमचाच वारसा चालवतो आहे... संघर्षाचा, जन सामान्यांच्या कल्याणासाठी... सदैव तुमच्या आठवणीत. विनम्र अभिवादन'!

दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त परळीमधील गोपीनाथ गड येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला व बालकल्याणविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच बीड लोकसभा मतदारसंघाच्या खा. प्रितम मुंडे उपस्थित होत्या.

यावेळी पश्चिम खोऱ्यातील पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणणे हे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते. ते आम्ही पूर्ण करणार आहोत. मराठवाड्याला दुष्काळातून सोडवणे हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhananjay munde on gopinath munde death anniversary