कोणाचीच गय नाही; फक्त माझी बदनामी करू नका : धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 February 2020

अशा घटनेटमध्ये मी कोणाचीही गय करणार नाही, मात्र व्यक्तीगत भांडणात माझे नाव जोडून बदनामी करू नये, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

बीड : परळी येथील व्यापारी व अन्य काही जणांमध्ये आपसात झालेल्या भांडणातून मारहाण झाली आहे. आरोपींवर गुन्हा नोंद करुन अटकी करण्यात आली आहे. अशा घटनेटमध्ये मी कोणाचीही गय करणार नाही, मात्र व्यक्तीगत भांडणात माझे नाव जोडून बदनामी करू नये, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

पुलाची सेंट्रिंग कोसळली, लोखंडी सळ्या पडून पाच मजूर दबले

परळी येथील टॉवर चौक परिसरात सोमवारी (ता. १७) सराफा व्यापारी अमर देशमुख यांना प्रॉपर्टीच्या वादातून मारहाण झाली. या प्रकरणी गणेश कराडसह इतरांवर गुन्हा नोंद झाला. दरम्यान, परळी येथील व्यापारी, नागरिक असे सर्वच आपले निकटवर्तीय आहेत. जवळचा किंवा दूरचा असे काही नाही. दोघांच्या वादात कुणीही कायदा हातात घेणार असेल तर त्याची गय मी करणार नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.

घाटी रुग्णालयात मोठा फ्रॉड - वाचा 

कोणत्याच परिस्थितीत शहरातील कायदा व सुव्यवस्था बिडघडलेली मी खपवून घेणार नाही. पोलीसांना तशा सूचना दिल्या असून संबंधित आरोपींवर जिवे मारण्याचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हाही नोंद करुन आरोपींना २४ तासाच्या आत अटक करण्यात आली आहे. परळीतील सर्वच जण आपल्या जवळचे असल्याने कुणाचेही वाद हे लोकांना माझ्याशी संबंधित वाटतात. परंतु हे भांडण त्यांच्यातील व्यक्तिगत कारणातून असून संबंधितांवर कडक कारवाई होईल, व्यक्तिगत भांडणांमध्ये माझे नाव जोडून नये, बदनामी करू नये असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

मराठा क्रांती मोर्चामुळे किती विकले गेले झेंडे- वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde Said Nobody Will Be Forgive Marathi News