वारसाच्या स्वाक्षरीनेच मुंडेंच्या नावाचे महामंडळ रद्द

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मार्च 2019

माजलगाव - केंद्र, राज्याची सर्व सत्ता; आमदार, खासदार आणि इतर स्थानिक संस्था; तसेच अगदी दारू फॅक्‍टरीही घरातच असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नाव न घेता मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर केला आहे. माजलगाव येथे रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बूथप्रमुखांच्या मेळाव्यात मुंडे बोलत होते. माजी मंत्री प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, उमेदवार बजरंग सानवणे, अशोक डक, जयसिंह सोळंके उपस्थित होते. मुंडे म्हणाले, की सर्व सत्ता देऊनही सामान्यांना काही मिळाले नाही. उलट गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने असलेले ऊसतोड मजूर महामंडळ भाजप सरकारने बरखास्त केले. महामंडळ बरखास्त करायला मंत्रिमंडळाचा ठराव लागतो. त्या ठरावावर त्यांच्या वारसदार (पंकजा मुंडे) यांचीही स्वाक्षरी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा राज्यघटना जाळण्याचा प्रकार घडूनही दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही. हे सर्वांत मोठे दुर्दैव आहे.
Web Title: Dhananjay Munde Talking Politics