धनंजय मुंडे नॉट रिचेबल, संदीप क्षीरसागर शरद पवारांसोबत

दत्ता देशमुख
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

  • बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार
  • संदीप क्षीरसागर यांनी भूमिका स्पष्ट 
  •  सोळंके व बाळासाहेब आजबे यांचेही तळ्यात-मळ्यात
  • चर्चेला उधाण

बीड - राज्यात झालेल्या राजकीय भूकंपात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या चार आमदारांपैकी केवळ संदीप क्षीरसागर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.  मात्र, धनंजय मुंडे नॉट रिचेबल असून माजी मंत्री प्रकाश सोळंके व बाळासाहेब आजबे यांचेही तळ्यात-मळ्यात दिसत आहे. 

बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा पैकी 4 आमदार आहेत. यात माजी विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आणि बाळासाहेब आजबे यांचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी राजकीय महाभारत घडले आणि अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील आमदार शरद पवार यांच्यासोबत की अजित पवारांसोबत असा प्रश्न पडला आहे.

त्यात संदीप क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत शरद पवार यांच्या सोबत असल्याचे जाहीर केले आहे. ते मुंबईत पवारांच्या पत्रकार परिषदेत देखील सोबत होते. पण, याच वेळी नेहमी प्रक्रियेत असणारे धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. त्यांचा मोबाईलदेखील लागत नाही. प्रकाश सोळंके व बाळासाहेब आजबे यांनीदेखील अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही.

 

हेही वाचा - मागील २९ दिवसांत असे बदलत गेले महाराष्ट्राचे राजकारण
देशमुखाच्या गडीत काय चालंलय - लातूर महापालिकेत काँग्रेसमध्ये अस्वस्थता
काय होणार - धनंजय मुंडे काका-सोबत की पुतण्यासोबत....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde's mobile phone not rechargeable