आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचे चक्काजाम आंदोलन
धनगर समाजाने एल्गार पुकारत चक्का जाम आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन केले. यावेळी धनगर समाज कृती समिती केजच्या वतीने तहसीलदार अविनाश कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
केज : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस टी) प्रवर्गात समावेश आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी सोमवार (ता. 13) ला सकाळी आकरा वाजता धनगर समाजाने एल्गार पुकारत चक्का जाम आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन केले. यावेळी धनगर समाज कृती समिती केजच्या वतीने तहसीलदार अविनाश कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
धनगर समाजाने धनगर समाजाचा समावेश (एस टी प्रवर्गात) करुन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. या मागणीसाठी सोमवारी धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले. यावेळी धनगर समाजबांधवानी मेंढ्या, महिलांसह मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. धनगर समाजाच्या आंदोलनास विविध राजकीय पक्ष व संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला होता. आंदोलनात विविध राजकीय, सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. दोन तास चाललेल्या रास्तारोको आंदोलनाने बीड, आंबाजोगाई व कळंब रस्त्यावर दुरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलन शांततेत पार पडण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.