धनगर समाजाचे ढोल जागर आंदोलन 

प्रल्हाद कांबळे 
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नांदेड : जिल्ह्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीसाठी व आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी. या मागणीसाठी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासोर ढोल जागर आंदोलन केले.
 
धनगरांना अनुसूचित जामातीचे आरक्षण असतानाही राज्यातील समाज या प्रवर्गाच्या सवलतीपासून वंचीत आहे. भाजप सरकारने निवडणूकीपूर्वी आश्वासन देवूनही त्याची पूर्तता केली नाही. याउलट सरकार धनगर समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत झोपेचे सोंग घेत आहे.

या सरकारला जागे करून आरक्षण अंमलबजावणी करण्यास भाग पाडण्यासाठी जिल्हा धनगर समाजाच्या वतीने हे आंदोलन केले. धनगरी सांस्कृतीक पद्धतीने वाद्य, आसुड, ओव्या, गीत म्हणीत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काही आंदोलकांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात संघटनेचे जिल्हा समन्वयक एकनाथ धमणे, नवनाथ काकडे, खंडोजी अकोले, शिवाजी होळकर यांच्यासह आदी समाजबांधव सहभागी झाले होते.

Web Title: Dhangar community Dhol jagar agitation