धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे रॅली काढण्यात आली. यावेळी पुकारण्यात आलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. या आंदोलनामुळे नांदेड, वसमत, वाशीम, रिसोड, जिंतूर या मार्गावरील वाहतुक सुमारे दिड ते दोन तास ठप्प झाली होती. आंदोलन काळात कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही.

हिंगोली : धनगर समाजाला अनुसुचीत जमातीच्या सवलती देण्याच्या आश्वासनाची त्वरीत अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता.१३) जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन झाले. यावेळी कुरुंदा (ता.वसमत) बंदला मोठा प्रतिसाद मिळाला तर सेंदुरसना (ता.औंढा) येथे रस्त्यावर टायर जाळण्यात आले. 

जिल्हयात सकल धनगर समाजाने या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर आज रास्तारोको करण्यात आला. हिंगोली तालुक्यातील कनेरगावनाका, कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, औढा नागनाथ तालुक्यातील सेंदुरसनापाटी, सेनगाव तालुक्यातील जिंतूर पाटी, औढा नागनाथ येथे जिंतूर टी पॉईंट येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे रॅली काढण्यात आली. यावेळी पुकारण्यात आलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. या आंदोलनामुळे नांदेड, वसमत, वाशीम, रिसोड, जिंतूर या मार्गावरील वाहतुक सुमारे दिड ते दोन तास ठप्प झाली होती. आंदोलन काळात कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही.

Web Title: Dhangar reservation agitation in Hingoli