Dhangar reservation : धनगर समाजाचा मेंढ्यांसह मोर्चा

अंबड आरक्षणाची मागणी, रास्ता रोकोनंतर प्रशासनाला निवेदन
jalna
jalna sakal

अंबड - धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (ता.१३) अंबडला मेंढ्यांसह मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

मत्स्योदरी देवी मंदिर परिसरातील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापासून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषणा देत धनगर समाज बांधवांच्या वतीने हजारो मेंढ्यासह मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बसस्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आला. तेथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

त्यानंतर अपर तहसीलदार ऋतुजा पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलिस निरीक्षक नाचन यांना उर्मिला लबासे, विजयमाला भालेकर, संगीता मैंद, शारदा पांढरे, भारती खरात, सविता जाधव, शारदा रांजने, जिजाबाई बेवले आदी महिलांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

jalna
Jalna News : जवखेडा पाटीवर अज्ञातांकडून परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक, जाळण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र विधिमंडळ अस्तित्वात आल्यापासून संविधानात्मक मिळालेल्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या लाभापासून धनगर समाज वंचित आहे. त्यामुळे धनगर समाज विकासाच्या प्रवाहापासून दूर आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात यावे.

jalna
Beed News : स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाची दुरवस्था

जातिनिहाय जनगणना करण्यात यावी. ओबीसी आरक्षणाची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने तयार केलेला अभ्यास अहवाल जाहीर करण्यात यावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. या आंदोलनात सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

jalna
Usmanabad News: उस्मानाबादमध्ये उरुसात चेंगराचेंगरी, १४ भाविक जखमी

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com