शेतकरी व आरक्षण प्रश्‍नांची सरकारने घेतली नाही दखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

माजलगाव - विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील मराठा, धनगर, मुस्लिम समाजांच्या आरक्षणाबाबत आणि शेतकऱ्यांच्या विकासाबाबत विविध आश्वासने देऊन सत्ता मिळविल्यानंतर तीन वर्षांत या सरकारने या प्रश्नांची साधी दखलही घेतली नाही, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालखेड गटातील उमेदवार कल्याण आबुज, केसापुरी गटातील प्रा. प्रकाश गवते व तालखेड, सावरगाव, केसापुरी, सादोळा, टाकरवण, किट्टी आडगाव गणांतील उमेदवारांच्या प्रचार सभेत रविवारी (ता. 12) हारकी लिंबगाव येथे येथे श्री. मुंडे बोलत होते. 

अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रकाश सोळंके होते. डॉ. भगवान सरवदे, बाजार समितीचे सभापती अशोक डक, दयानंद स्वामी, कचरू खळगे, तालुकाध्यक्ष भीमराव हाडुळे, वसंतराव घाटुळ, नारायण मुळे, राजेंद्र मोरे, विजय अलझेंडे, अण्णासाहेब तौर, उत्तमराव डावरे, डॉ. श्रीराम खळगे, शिवाजी रांजवण यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी श्री. मुंडे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस आदी पिकांना पाच ते सहा हजार रुपये भाव असतानाही शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांवर आपला माल विकून प्रतिक्‍विंटल 2 हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे सांगून न्यायालयात 21 तारखा झाल्या, परंतु या सरकारने न्यायालयात साधा वकीलही दिला नाही तर राज्यातील धनगर समाजाला सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ, अशी जाहीर कबुली देऊनही 125 कॅबिनेट बैठका होऊनही या बैठकीत साधा आरक्षणाचा शब्दही न काढता या सरकारने मराठा, धनगर, मुस्लिम समाजाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप मुंडे यांनी केला. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला साथ द्या, जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असे आश्वासन श्री. मुंडे यांनी दिले. 

जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या विकासाचे राजकारण करण्याऐवजी भावनिक भाषण करत आहेत, राज्यात आणि देशात भाजपचे सरकार असताना जिल्ह्याचा काय विकास केला, असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. यावेळी माजी मंत्री प्रकाश सोळंके, डॉ. भगवान सरवदे यांची भाषणे झाली.

Web Title: Dhanjay mudhe in majalgaon