धर्माबादेत ४०० वाहनचालकांना ५० हजारांवर दंड

dhrmabad.jpg
dhrmabad.jpg


धर्माबाद, (जि.नांदेड) ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटकर यांनी खासगी वाहने रस्त्यावर आणण्यास निर्बंध घातले आहेत. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करीत जीवनावश्यक साहित्याच्या नावाखाली अनेकांचे शहरभर फिरणे सुरूच आहे. लॉकडाऊन दरम्यान प्रशासकीय सूचनांचे उल्लंघन करून रस्त्यावर वाहने फिरविणाऱ्या धर्माबाद शहरातील ४०० वाहन चालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली असून ५० हजारांच्या वर त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

शिरकाव आता मराठवड्यातही
कोरोना विषाणूचा शिरकाव आता मराठवड्यातही झाला आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी मोडून काढण्यासाठी शासन, प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दत्तात्रय शिंदे, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगारे, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले, पोलिस उपनिरीक्षक गणेश कराड, मुख्याधिकारी मंगेश देवरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इकबाल शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक खंदारे, गटविकास अधिकारी श्रीकांत बेळदे, डॉ. संजय पोहरे, डॉ. प्रवीण कांबळे, डॉ. वेणूगोपाल पंडित, डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार, डॉ. प्रदीप म्याकलवार, डॉ. शेख नसीमा इकबाल यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व पोलिस कर्मचारी युध्दपातळीवर कोरोनाशी लढाई देत कोरोना व्हायरस रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.


कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान अनेक वाहन चालकांनी वाहने रस्त्यावर आणली होती. त्यामुळे शहरात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिस कर्मचारी माधव पाटील खतगावकर व पोलिस शिवाजी सूर्यवंशी यांनी कोरोना दरम्यान ४०० वाहनांवर कारवाई करून ५० हजार रुपयांच्या वर दंड वसूल केले. व वाहन चालकांना समज देऊन सोडण्यात आले. पुढील टप्प्यात आता थेट वाहने जप्त करण्याची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

धर्माबादेत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
शहरातील गांधीनगर येथील एक युवक दारूलूम मुज्जफरनगर उत्तरप्रदेश येथून धर्माबादला परतला होता. तालुक्यातील येवती येथील एक प्रौढ व्यक्तीही गावाकडे परतल्यानंतर या दोघांना आरोग्य तपासणीसाठी नांदेडला पाठविण्यात आले होते. परंतु त्या दोघांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे धर्माबादेत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. लॉकडाऊनच्या काळात धर्माबाद शहर व तालुक्यात १ हजार ३५० च्या वर नागरिक होम क्वारंटीन आहेत. या सर्व लोकांना १४ दिवस घरातच राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला असून पोलिस या सर्वांवर लक्ष ठेऊन आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com