लातूर ग्रामीण : काँग्रेसचे धीरज देशमुख | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

लातूर - लातूर ग्रामीण मतदारसंघात पहिल्या फेरीत काँग्रेसचे धीरज देशमुख ५४८० मतांनी आघाडीवर आहेत. वंचित बहुजन आघाडीचे मंचकराव डोणे ४०५ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर तर शिवसेनेचे सचिन देशमुख ३८३ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर. नोटाला १४११ मते.

लातूर - लातूर ग्रामीण मतदारसंघात पहिल्या फेरीत काँग्रेसचे धीरज देशमुख ५४८० मतांनी आघाडीवर आहेत. वंचित बहुजन आघाडीचे मंचकराव डोणे ४०५ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर तर शिवसेनेचे सचिन देशमुख ३८३ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर. नोटाला १४११ मते.

लातूर जिल्ह्यात लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहा विधानसभा मतदारसंघांत 79 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ता. 21 ऑक्‍टोबरला या सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य 'ईव्हीएम'मध्ये बंद झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होत आहे. या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी अशा अनेक पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षही निवडणुकीच्या रिंगणात राहिले. मतदान झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आता आकडेमोड करण्यास सुरवात केली आहे.

आपलाच उमेदवार कसा विजयी होतो हे आवर्जून सांगितले जात आहे. पाच हजारांपासून ते एक लाखापर्यंतचे कसे मताधिक्‍य मिळणार, याचे आखाडेही बांधले जात आहेत. अनेकांनी तर पैजाही लावल्या आहेत. उमेदवारांच्या विजयाची सोशल मीडियातही याची चर्चा केली जात आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता सहाही मतदारसंघांत मतमोजणीला सुरवात झाली आहे. गुलाल कोणाच्या कपाळी लागणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल; पण सध्या तरी उमेदवारांची धाकधूक अन्‌ नागरिकांची उत्सुकता लागली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dheeraj Deshamukh leads in Latur Gramin