धनगर समाजाचे परभणी जिल्हा कचेरीसमोर ढोल जागर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

अनुसूचित जामातीचे आरक्षण अंमलबजावणीत झोपेचे सोंग घेणाऱ्या शासनाला जागे करण्यासाठी सोमवारी (ता.27) धनगर समाजाने परभणी जिल्हा कचेरीसमोर ढोल बडविले. या आनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

परभणी- अनुसूचित जामातीचे आरक्षण अंमलबजावणीत झोपेचे सोंग घेणाऱ्या शासनाला जागे करण्यासाठी सोमवारी (ता.27) धनगर समाजाने परभणी जिल्हा कचेरीसमोर ढोल बडविले. या आनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

धनगरांना अनुसूचित जामातीचे आरक्षण असतानाही राज्यातील समाज एसटीच्या सवलतीपासून वंचित आहे. भाजपने आश्वासन देवूनही त्याची पूर्ती केली नाही. उलट सरकार झोपेचे सोंग घेत आहे. या सरकारला जागे करून आरक्षण अंमलबजावणी करण्यास भाग पाडण्यासाठी जिल्हा धनगर समाजाच्या वतीने हे आंदोलन केले. धनगरी सांस्कृतीक पद्धतीने वाद्य, ओव्या, गीत म्हणीत आदीवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, काही आंदोलकांनी मनोगत व्यक्त केले. परभणीसह तालुक्यातील तहसिलसमोर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सुरेश भूमरे, मारोतराव बनसोडे पहेलवान, गणेश मिराशे, अनंत बनसोडे, विलास लुबाळे यांच्यासह आदी समाजबांधव सहभागी झाले आहेत.

Web Title: Dhol Jagar agitation against govvernment at District Kacheri of Dhangar community in parbhani