ढोल जागर आंदोलन करत आरक्षणाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

हिंगोली : हिंगोलीसह पाचही तालुक्‍यांच्‍या ठिकाणी सकल धनगर समाजातर्फे सोमवारी (ता.27) मोर्चा काढत ढोल जागर आंदोलन करण्यात आले. सेनगाव येथे शेळी व मेंढ्यासह धनगर समाजातील बांधव रस्‍त्‍यावर उतरले होते. 

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्‍या सवलती लागू कराव्यात, अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाला 2 हजार कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी सकल धनगर समाजातर्फे आंदोलन केले जात आहे.

यापूर्वी धरणे आंदोलन, रास्‍तारोको करण्यात आला. त्‍यानंतर आज हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहापासून ढोल जागर आंदोलन सुरु करण्यात आले. यावेळी सुमारे दोन हजारपेक्षा अधिक समाज बांधव सहभागी झाले होते. जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी ठाण मांडल्‍यामुळे हिंगोली ते नांदेड मार्गावरील वाहतूक विस्‍कळीत झाली होती. सेनगाव येथे सकल धनगर समाज बांधव शेळी व मेंढ्यासह रस्‍त्‍यावर उतरले होते. औंढा नागनाथ, वसमत व कळमनुरी येथे आंदोलन करण्यात आले.

Web Title: Dhol Jagar agitation for Dhangar reservation