परभणीचे लाभार्थी साधणार पंतप्रधानांशी संवाद 

कैलास चव्हाण
सोमवार, 4 जून 2018

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या अडीअडचणी, कामाची सुधारणा, कामाचा दर्जेदारपणा आणि यातील यशस्वीते संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट बोलणार आहेत.

परभणी - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या परभणी जिल्ह्यातील निवडक 15 लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी (ता. 5) सकाळी 9:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहेत. यासाठी राज्यातील एकमेव परभणी जिल्ह्याची निवड झालेली आहे.

या संवादातून लाभार्थ्यांच्या अडीअडचणी, कामाची सुधारणा, कामाचा दर्जेदारपणा आणि यातील यशस्वीते संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट बोलणार आहेत. या परभणी जिल्ह्यातील 15 लाभार्थींची निवड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. देशातील पाच राज्यातील पाच जिल्हे यासाठी निवडले असून महाराष्ट्रातील एकमेव परभणीचा समावेश झाला आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा संवाद होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण दुरदर्शन या सरकारी वाहीनीवर होणार आहे. अशी माहीती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी पृथ्वीराज यांनी दिली.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Dialogue with Prime Minister who are beneficiary of Prime Ministers Housing Scheme