file photo
file photo

औरंगाबादेत डायमंड कप इंडिया- आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा

औरंगाबाद: इंडियन बॉडी बिल्डिंग ऍण्ड फिटनेस फेडरेशनच्या वतीने ता. 15 ते 17 नोव्हेंबरदरम्यान "डायमंड कप इंडिया-2019' या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी जगभरातील 37 देशांतील 350 खेळाडूंची नोंदणी झाली आहे.

भव्यदिव्य आणि राष्ट्रीय मानांकनाच्या आधारावर ही स्पर्धा घेतली जाणार आहे, अशी माहिती इंडियन बॉडी बिल्डिंग ऍण्ड फिटनेस फेडरेशन व एशियन फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग ऍण्ड फिटनेसचे सरचिटणीस डॉ. संजय मोरे यांनी मंगळवारी (ता.12) पत्रकार परिषदेत दिली. 


श्री. मोरे म्हणाले, की विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्पर्धा होईल. "आयबीबीएफ'चे अध्यक्ष राफेल सॅंटोसा यांच्यासह शंभराहून अधिक पदाधिकारी, आंतरराष्ट्रीय पंच यांची उपस्थिती राहणार आहे. शरीरसौष्ठव स्पर्धा 10 वजनी गटात मेन्स क्‍लासिक, मेन्स फिजिक, वुमेन्स बिकनी, वुमेन्स फिटनेस अशा स्वरूपाची होईल.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसोबतच इतर 10 विविध खेळांच्या जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धाही घेतल्या जाणार आहेत. 15 नोव्हेंबरला विदेशातील खेळाडू औरंगाबादेत दाखल होतील. त्यांच्या निवासाची व्यवस्था आयोजकांनी केली आहे. स्पर्धेसाठी विभागीय क्रीडा संकुलात शंभर बाय 40 व 7 फूट उंच अशा पद्धतीचे स्टेज बनविण्यात आले आहे. तसेच 50 हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. 

अन्य स्पर्धांचेही आयोजन 

पंजा लढवा, बेंच प्रेस, लिफ्टिंग, रस्सीखेच, कराटे, सायकलिंग, फॅशन शो, योगा, जुडो, स्केटिंग, सायकलिंग, बॅंच प्रेस या स्पर्धेचेही आयोजन करण्यात आलेले आहे. यासह शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना शरीरसौष्ठव स्पर्धेचे महत्त्व कळावे, यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. 

कार्यक्रम भव्य-दिव्य होणार 

आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाचा बहुमान औरंगाबादला मिळाला आहे. स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी आम्ही सर्वत्र फिरलो. मात्र, कोणीही मदत केली नाही. अनेक उद्योजकांकडे गेलो त्यांनीही मदत केली नाही. असे असले तरी स्वत: खर्च करून ही स्पर्धा भव्यदिव्य स्वरूपात साजरी करणार आहोत, असेही संजय मोरे यांनी नमूद केले. यावेळी जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव राजू वरकड उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com