बीड शहराला डिजिटल बॅनरचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

बीड - सध्या शहरात कुणाचा वाढदिवस असो की काही कार्यक्रम यासाठी लगेच कुठेही डिजिटल बॅनर लावण्याचा धडाका सुरू झाला आहे. यामुळे शहर विद्रुप दिसत असून, शहरातील दुभाजकांमध्येही डिजिटल बॅनर लावल्याचे दिसत आहे. यामुळे शहरातील वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

सध्या शहरातील मुख्य रस्ते पाहिल्यास सर्वत्र डिटिजल बॅनर दिसून येतात. यामध्ये कुणाचा वाढदिवस असतो, तर कुणाचे विविध खासगी कार्यक्रम असतात. शहरातील मुख्य रस्त्याच्या बाजूला व शहरातील दुभाजकामध्ये डिजिटल बॅनर लावले जातात. सध्या बार्शी रोड, नगर रोड, जालना रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, नगर नाका, शिवराज पान सेंटर, सुभाष रोड यांसह शहरातील अनेक रस्त्यांवर डिजिटल बॅनर लावलेले दिसतात. जर एखाद्या तरुणाचा वाढदिवस असेल तर लगेच बॅनर लावले जाते. विशेष म्हणजे बॅनर लावताना नियमांचे पालन केले जात नाहीत. शहरातील चौकात किंवा दुभाजकांमध्ये हे बॅनर लावले जातात. यामुळे अनेकवेळा अपघात घडत आहेत. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. 

रस्त्यांना विळखा
शहरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांवर कितीही डिजिटल बॅनर लावले जात आहेत; मात्र या सर्व प्रकारांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने शहरतील रस्त्यांना बॅनरचा विळखा बसत आहे.

Web Title: digital banner issue

टॅग्स