चारा पिकांसाठी थेट अनुदान देऊ

सुधीर मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार

औरंगाबाद - दुष्काळी स्थितीमध्ये जनावरांना चारा कमी पडू नये, यासाठी कमी पाण्यातील चारा पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याचा विचार आहे. येत्या काही दिवसांत या योजनेचे मूल्यांकन करून पुनर्विचार करण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.

राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा आहे. अर्थसंकल्पात शेती सुधारण्यासाठी चांगली तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता.२५) अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दुष्काळ आढावा घेतला. वन विभागाचे काम आणि उद्दिष्टांचा लेखाजोखा घेतल्यानंतर मराठवाडा विकास मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, की चाराटंचाईबाबत छावणी की दावणी हा वाद आहे. मात्र, परिस्थितिजन्य योग्य उपायांची अंमलबजावणी करण्यावर भर आहे. प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांना कमी पाण्यात निघणाऱ्या चारा पिकांसाठी अनुदान दिले जाईल.

योजनेचा फायदा पाहून पुन्हा राबविण्याबाबत निर्णय होईल. वैतरणा प्रकल्पाचा प्रश्‍न निधीचा नसून सामाजिक आहे.  शेतजमिनीचे संपादन करण्याचे काम कोकण विभागाने केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील १८० तालुक्‍यांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. जिल्ह्याचा आढावा घेऊन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पालकमंत्री व आमदारांची आहे. पालकमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आढावा मांडल्यास तातडीने मदत पुरविली जाईल असे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

यावेळी आमदार अतुल सावे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com