esakal | दिव्यांगांसाठी पंचायत समित्यांत ‘सल्ला व मार्गदर्शन’ 
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग लोगो.jpg

प्रत्येक गुरुवारी तज्ज्ञ साधणार संवाद, योजनांसह कायद्यांची दिली जाणार माहिती 

दिव्यांगांसाठी पंचायत समित्यांत ‘सल्ला व मार्गदर्शन’ 

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : दिव्यांगांसाठी शासनाचे विविध नियम व योजना आहेत. मात्र, या योजनांची अंमलबजावणीही नीट होत नाही आणि दिव्यांगांना त्याची माहितीही होत नाही. मात्र, आता यासाठी प्रत्येक पंचायत समित्यांमध्ये ‘सल्ला व मार्गदर्शन कक्ष’ सुरु करण्यात आला असून प्रत्येक गुरुवारी तज्ज्ञांकडून दिव्यांगांना मार्गदर्शन केले जाणार आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

या कक्षांमध्ये दिव्यांगांच्या विशेष शाळांतील सामाजिक कार्यकर्ता, मानसशास्त्र तज्ज्ञ, वाचा उपचार तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षकांची नेमणूक केल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त व जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी डॉ. सचिन मडावी यांनी दिली. या कक्षांमुळे दिव्यांगांची होणारी फरफट थांबून त्यांना विविध शासकीय येाजना, दिव्यांगांचे प्रमाणपत्र, अर्जांची माहिती, माहिती न दिल्यास दंडांची माहिती, दिव्यांगांचे अधिकार, त्यांच्या आजाराचे निदान व उपचारांची माहितीही दिली जाणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यामुळे दिव्यांगांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज आता पडणार नाही. प्रत्येक गुरुवारी तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये त्यांना मार्गदर्शन व सल्ला मिळणार आहे. कक्षासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे पत्रही प्रत्येक गटविकास अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या तज्ज्ञांची केली नेमणूक 

 • पंचायत समिती : तज्ज्ञाचे नाव. 
 • परळी : सुरेश नवाडे. 
 • गेवराई : प्रवीण पांडव. 
 • माजलगाव : विठ्ठल खंडगावे. 
 • आष्टी : दिलीप खिल्लारे. 
 • वडवणी : बालाजी तांबीले. 
 • अंबाजोगाई : ए. व्ही. सावरगावकर. 
 • धारुर : एस. के. जाधव. 
 • बीड : जे. एस. तामसेकर. 
 • पाटोदा : बापूराव शिंदे. 
 • केज : ए. के. चव्हाण. 
 • शिरूर : आदिनाथ सानप. 


सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार पंचायत समित्यांमध्ये दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांगांना आता जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गरज पडणार नाही. त्यांची फरफट थांबणार आहे. 
- डॉ. सचिन मडावी, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद. 

(संपादन-प्रताप अवचार)