वाढीव कामे निविदेत घुसडल्यास शिस्तभंग शासनाचे आदेश

माधव इतबारे 
बुधवार, 13 जून 2018

औरंगाबाद : एखाद्या कामाच्या जुन्याच निविदेत नवीन काम घुडल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. असे आदेश राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने काढले आहेत. लोकलेखा समितीने यासंदर्भात आक्षेप नोंदविल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 
स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत विकास कामे करताना निविदांमध्ये घोळ केला जातो. यासंदर्भात लोकलेखा समितीच्या 2017-18 च्या अहवालात आक्षेप घेण्यात आला आहे. तांत्रिक किंवा प्रशासकीय मंजुरी नसताना जुन्या निविदांमध्ये अनेक कामे घुसडविल्याने गंभीर अनियमितता होत असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले आहे.

त्यानुसार नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना निविदेसंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आदेश काढले आहेत. प्रत्येक कामासाठी ई-निविदा प्रक्रियेचा अवलंब करावा, मंजुरीच्या आदेशात नमूद व तांत्रिक मान्यता असलेल्या कामांचाच निविदेत समावेश करावा, प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेशिवाय निविदा प्रसिद्ध करण्यात येऊ नयेत, केंद्रीय दक्षता आयोगाने वारंवार दिलेल्या आदेशाचे, मार्गदर्शक तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करावे, नविदेमध्ये समाविष्ट असलेल्या कामा व्यतिरिक्त कामे करण्यात येऊ नयेत, जुन्या निविदेत नवीन कामे घुसडून कार्यादेश देऊ नये, असे आढळून आल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Disciplinary Government Orders on Increasing Works