शहराच्या विकासावर होणार चर्चा 

शहराच्या विकासावर होणार चर्चा 

औरंगाबाद - महानगरपालिकेच्या विविध विकासात्मक विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी ही माहिती दिली. 

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन महापालिकेच्या विविध विषयांसंबंधी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिलेले निवेदन देऊन चर्चा केली; परंतु आचारसंहिता असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरच बैठक बोलाविण्याचे आश्वासन खैरे यांना दिले होते. त्यांनतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून जूनच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेच्या विविध विषयांवर बैठक बोलाविण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. महापौरांनी निवेदनात समांतर पाणीपुरवठा योजना राबविणे, भूमिगत गटार योजना, सव्वाशे कोटींच्या निधीतील रस्ते, कचऱ्याच्या सुधारित डीपीआरला मंजुरी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाची उंची वाढविणे व संशोधन केंद्र उभारणीसाठीचा निधी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, जालना रोडचे भूसंपादन, सफारी पार्कसाठी निधी, सातारा-देवळाईच्या विकासासाठी डीपीआरला मंजुरी आदी कामांचा समोवश आहे. या विषयावर मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. बैठकीस शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार, मनपा पदाधिकारी, आयुक्त उपस्थित राहणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com