शहराच्या विकासाला अतिक्रमणांचा रोग : कोणतं आहे हे शहर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

नांदेड :  संपूर्ण शहराला अतिक्रमणाची लागण झाली असून महापौर शीला ढबाले यांनी या रोगावर ठोस उपचारासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे. अतिक्रमणाचा रोग का पसरला? याबाबतच्या दुर्लक्षामुळेच खाबुगिरी वाढली. परिणामी अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. फेरीवाल्यांनाच अतिक्रमणधारक सिद्ध करून अधिकारी फेरीवाला संरक्षण व नियमन कायद्याचेही उल्लंघन करीत आहे. आयुक्त, पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी अंधारात ठेवल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे. 

नांदेड :  संपूर्ण शहराला अतिक्रमणाची लागण झाली असून महापौर शीला ढबाले यांनी या रोगावर ठोस उपचारासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे. अतिक्रमणाचा रोग का पसरला? याबाबतच्या दुर्लक्षामुळेच खाबुगिरी वाढली. परिणामी अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. फेरीवाल्यांनाच अतिक्रमणधारक सिद्ध करून अधिकारी फेरीवाला संरक्षण व नियमन कायद्याचेही उल्लंघन करीत आहे. आयुक्त, पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी अंधारात ठेवल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे. 

अनेक वर्षांपासून महापालिकेचे अधिकारी केवळ फेरीवाले, भाजीविक्रेते, टपरी हटवून अतिक्रमण हटविल्याचा बनाव करीत नागरिकांच्याच नव्हे तर आयुक्त, पदाधिकाऱ्यांच्याही डोळ्यात धूळफेक करीत आहे. फेरीवाल्यांच्या संरक्षणार्थ कायदा असून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत अधिकाऱ्यांनी अशी अनेकदा अतिक्रमणविरोधी कारवाई केली. करीत आहेत. दुसरीकडे पक्के बांधकाम करून रस्त्यांपर्यंत अतिक्रमण करणाऱ्या विविध बाजारपेठेतील दुकानदारांकडे मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. 

अतिक्रमण हटविलेच पाहिजे 
शहरातील अतिक्रमणाचा सफाया व्हावा, यासाठी प्रत्येकजण आग्रही आहे. मात्र, काहींनी फेरीवाल्यांच्या उपजिविकेवर पाय देण्याऐवजी त्यांच्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी होत आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांच्या कडेला कार पार्किंग केले जाते. तेही एकप्रकारे अतिक्रमणच आहे. मात्र, त्ंच्यावर कारवाईसाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे.


शहरात ठिकठिकाणी व्यावसायिकांनी अशाप्रकारे अतिक्रमण केले (छायाचित्र ः सचिन डोंगळीकर)

फेरिवाल्यांसाठी जागा द्यावी 
अतिक्रमण हटविणे योग्यच आहे. परंतु अतिक्रमणाची व्याख्या अधिकाऱ्यांनी पाहावी. फेरीवाले अतिक्रमणकर्ते नाहीत. पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांनी फेरीवाला उपजिविका कायदा २०१४वाचून काढावा. फेरीवाले कमी दरात आवश्‍यक साहित्य विक्री करून सामान्य व गरीब नागरिकांची गरज भागवितात. त्यांच्यासाठी महापालिकेने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जागा आरक्षित केल्यास रस्त्यांवरील विक्रेत्यांची संख्या कमी होईल, अशी प्रतिक्रिया राधेश्‍याम सोमाणी यांनी दिली. 

ग्राहकांनाच मनःस्ताप 
अतिक्रमणामुळे सामान्यनागरिक त्रस्त असून महापौरांसह आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे. अनेक दुकानांमुळे फेरीवाले उभे राहतात. त्यामुळे दुकानात येणाऱ्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, व्यवसायाची मुभा फेरीवाल्यांनाही आहे. त्यामुळे महापालिकेने त्यांच्यासाठी जागा निश्‍चित करावी. काही व्यापाऱ्यांनी दुकानामुळे पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले, त्याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे मत हनुमानदास मनियार यांनी व्यक्त केले.

Image may contain: car, motorcycle and outdoor
उड्डाणपुलावरच चार चाकी वाहनांची पार्किंग होत असल्याने नेहमीच शहरात वाहतुक विस्कळीत होते.

झारीतील शुक्राचार्य टपून आहेत                                                        शहराला केवळ फेरीवाल्यांचा त्रास नाही. वाहतूक कोंडीस कारण ठरणाऱ्या हॉटेलवाल्यांचा, रस्ते अडवणाऱ्या आॅटोवाल्यांचा, पार्किंगची जागा न ठेवता उभ्या झालेल्या हॉस्पिटल्सचा, छोट्या-मोठ्या दुकानांनी रस्ते गिळंकृत केल्याने निर्माण झालेल्या गर्दीचा आणि अशा अनेक गोष्टींचा त्रास आहे. त्यामुळे या प्रकरणी भेदभाव नको. तरच सर्वांची साथ मिळेल. अन्यथा सारे नियम केरात जावे यासाठी झारीतले शुक्राचार्य टपूनच बसलेले आहेत.

वजिराबादेत दुकानांपुढेच भाजीविक्रेते बसतात. फळविक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात हातठेले लागत असल्याने ग्राहकांना दुकानात येताना तर रस्त्यांवरून जातानाही त्रास सहन करावा लागतो. या विक्रेत्यांसाठी धान्य बाजारापासून वेगळा बाजार महापालिकेने तयार करून द्यावा. याच भगात महापालिकेने पार्किंग किंवा प्रसाधनगृह तयार करण्याची गरज आहे.                                                                        -  रामप्रसाद स्वामी (ज्येष्ठ नागरिक)

 अतिक्रमण कारवाईला विरोध नाही. परंतु, कारवाईत भेदभाव केला जात आहे. गेल्या काही वर्षात एमआरटीपी  कारवाईच्या फायली महापालिकेत प्रलंबित आहे. ते अतिक्रमण का तोडले जात नाही. यात जर आम्हा दुकानदारांचाही समावेश असेल तर तेही तोडावे. नोटिसा दिल्या परंतु कारवाई केली जात नाही. अधिकारी नोटीत देऊन गप्प का बसतात? याचा विचार करावा.                        - वामनराव सोळुंके (व्यावसायिक) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disease encroaching on the development of the city: Who the city is