मराठवाडयात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव; कृषी विद्यापीठाच्या शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

Disease on Kapashi Crops in Marathwada Agricultural University Advisor
Disease on Kapashi Crops in Marathwada Agricultural University Advisor

परभणी : सलग तीन आठवडे पावसाचा खंड आणि त्यानंतर दोन दिवस अतिवृष्टी यामुळे मराठवाडयात फुलोरा व बोंड धरण्याच्या अवस्थेत असलेल्या कपाशीवर आकस्मिक मर रोग आढळून येत असल्याने त्यावर वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे.

नुकत्याच झालेल्या पावसानंतर अचानक कपाशीत मर रोग आढळून येत आहे.त्याची पहाणी कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केली आहे. हा कुठला रोग नसुन कपाशीतील विकृती आहे. सतत १५ दिवस पाण्याचा ताण पडला आणि पाणी दिले किंवा पाऊस पडला तरी मर होते. प्रखर सुर्यप्रकाश किंवा सतत ढगाळ वातावरण यामुळे ही मर दिसते. जास्त पाणी झाले तरीही मर होते. या विविध कारणांपैकी एक कारण मर येण्यासाठी पुरेसा आहे अशी माहिती विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. अशा परिस्थितीत कापुस पीक मुळावाटे अन्न घेवू शकत नाही. अन्नपुरवठा बंद झाल्यामुळे पीक मलूल होते व सुकल्यासारखे दिसते. यासाठी शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता साधे सोपे उपाय करावेत असा सल्ला त्यांनी दिला आहे. प्रथमत: शेतामधून पाण्याचा निचरा करावा. जास्तीचे पाणी शेतातून काढून 

टाकावे. त्यानंतर १५ ग्रॅम युरिया अधिक १५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश अधिक २ ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराईड प्रति लिटर पाण्यात टाकून चांगले मिसळून घ्यावे. हे द्रावण १०० ते १५० मिली उमळलेल्या झाडाला टाकून आळवणी करावी. यामुळे पीकाला लगेच अन्नद्रव्य उपलब्ध होतील आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून बुरशीनाशकाचा वापर करावा. जसजसी वापसा होईल तसतसे पीकात सुधारणा होईल. जमिनीत हवा आणि पाण्याचे प्रमाण सारखे झाले की मुळे अन्न घ्यायला सुरवात करतात आणि मर विकृती हळूहळू कमी होते, असा सल्‍ला डॉ. आळसे यांनी दिला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com