Distribute nutrition diet to children in Anganwadi of Fulambri
Distribute nutrition diet to children in Anganwadi of Fulambri

अंगणवाडीच्या मुलांना पोषण आहार वाटप; पिंपळगावच्या ग्रामपंचायतीचा उपक्रम 

फुलंब्री : पिंपळगाव वळण (ता. फुलंब्री) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील अंगणवाडीच्या मुलांना पोषण आहार वाटप करण्यात आला. सरपंच कांताबाई अरुण वाहटूळे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडीच्या मुलांना केळी, सफरचंद, बिस्कीट, डाळिंब, संत्रा, खारीक- खोबरे आदी वाटप करण्यात आले. तसेच महिलांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी महिलांना हिमोग्लोबिनच्या गोळ्यांचेही यावेळी वाटप करण्यात आले.

याप्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जगन्नाथ  वाहटूळे, ग्रामपंचायत सदस्य प्रेमीला क्षिरसागर, द्वारकदास वाहटूळे, अरुण वाहटूळे, दादा  वाहटूळे, कृष्णा वाहटूळे, अशोक वाहटूळे, कचरू जाधव, ग्रामसेवक हनुवते, अंगणवाडी सेविका नंदाताई खेळवणे, मिनाबाई माळवे, कासाबाई पल्हाळ, संगीता पवार, यमुनाबाई म्हस्के, मदतनीस रेश्मा चव्हाण, राधाबाई बनसोड, संगीता तुपे, शोभाबाई जाधव, विमलबाई केजभट, नानुबाई वाहटूळे, अनुसया वाहटूळे, मलेरिया डॉक्टर आर.एस.राठोड, जयसिंग वाहटूळे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com