जालना जिल्ह्यात 616 कोटी 24 लाखांचे पीककर्ज वाटप

उमेश वाघमारे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

जालना : यंदा जिल्ह्यातील बँकांना खरीप पीककर्ज वाटपाचे 1259 कोटी 10 लाख रुपयांचे उद्दिष्टे देण्यात आले आहेत. या उद्दिष्टानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 90 हजार 875 शेतकर्‍यांना 616 कोटी 24 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 1259 कोटी 10 लाख रुपयांचे खरीप पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्टे शासनाने दिले होते. मात्र बँकांच्या उदासिनतेमुळे आतापर्यंत केवळ पन्नास टक्के उद्दिष्टे पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टे पूर्ण होत नसल्याचे चित्र असून अनेक गरजू शेतकरी खरीप पीककर्जापासून वंचित राहिल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात दर सोमवारी आतापर्यंत खरीप पीककर्जाचे 11 मेळावे घेण्यात आले आहेत. या मेळाव्यांना शाखाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती बॅकने 29 हजार 437 शेतकऱ्यांना 54 कोटी 25 लाख, राष्ट्रीयीकृत बँकांनी 39 हजार 653 शेतकऱ्यांना 379 कोटी 22 लाख तर ग्रामीण बँकांनी 21 हजार 785 शेतकऱ्यांना 182 कोटी  77 लाख रूपयांचे पिककर्ज वाटप केले आहे.

Web Title: Distribution of 616 Crore 24 lacs in Jalna district