गाव पाणीदार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीही केले श्रमदान

तानाजी जाधवर
शनिवार, 21 एप्रिल 2018

उस्मानाबाद : पाणी फाऊंडेशनच्यावतीने घेण्यात येत असलेल्या वॉटर कप स्पर्धेला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. श्रमदान करण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उस्मानाबाद तालुक्यातील कावलदरा येथे पोहचले. अगदी पहाटेच तिथे जाऊन ग्रामस्थाबरोबर त्यानी श्रमदान करीत गाव पाणीदार करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. 

उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख गेल्या काही वर्षापासून दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणुन बनत चाललेली आहे. मात्र जलयुक्तच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली, तेव्हाच लोकांनी यामध्ये पुढाकार घेत मोहिम यशस्वी पणे राबविली होती. त्यानंतर पाणी फाऊंडेशनकडुन वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील अनेक गावांनी सहभाग नोदविला होता. आताही जिल्ह्यातील मोठ्या संख्येने गावाचा कृतीशील सहभाग दिसून येत आहे. यामध्ये सामाजिक संघटना, राजकीय पुढारी आणि आता जिल्हाधिकारी यांच्यासह त्यांचे सर्वच सहकारी यानी श्रमदानात सहभागी होण्यासाठी हजेरी लावली. 

गावा - गावातले गटातटाची राजकीय वितुष्ट येथे मात्र दिसून येत नसल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. गावागावामध्ये प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी त्यांचे सर्व वरिष्ट अधिकारी आणि किमान पाचशे कर्मचारी यांना सोबत घेऊन श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कावलदरा येथे पोहचले. गावाच्या बाहेरील डोंगरावर जलसंधारणाचे काम सध्या सूरु आहे. तिथे जाऊन हातात टिकाव, खोरे घेत जिल्हा प्रशासनातील लोकांनी कामाला सूरुवात केली. या गावामध्ये लोकसंख्या कमी असली तर उत्साह मात्र दांडगा असून तरुणाची फौज चांगलीच मेहनत घेताना दिसत आहे, तर महिलाही या कामामध्ये पुरुषाच्या बरोबरीने काम करताना दिसत आहेत. गाव पाणीदार झाले पाहिजे यासाठी ही सगळी मंडळी धडपडताना दिसत आहेत.

Web Title: The District Collector also did the Shramdan to water the village