चक्क..! जिल्हाधिकाऱ्यांनी स्वॅब घेतला अन् त्याचा अहवाल निगेटिव्ह आला

chakur.jpg
chakur.jpg

चाकूर (लातूर) : येथील कोवीड केअर सेंटरला शनिवारी (ता.८) जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी भेट देऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी रॅपीड अंटीजन टेस्टसाठी स्वॅब घेण्याची पध्दत जाणून घेतली. तर स्वत: एका संशयिताचा त्यांनी घेतला. आणि त्या व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह आला.

चाकूर येथील कोवीड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी (ता.७) सकाळी एक व्यक्ती भोवळ येऊन पडला होता. त्याला उचलून उपचारासाठी घेऊन जाण्याऐवजी त्याचा व्हिडीओ करून व्हायरल करण्यात आला होता. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. ज्यांनी हा व्हिडीओ केला होता. त्यास खडेबोल सुनावले. तुझ्या घरचा व्यक्ती असा पडला असता तर व्हिडीओ केला असता का? पॉझिटिव्ह रुग्णांनी पॉझिटिव्ह विचार करून त्यास मदत केली असती. त्याचा व्हिडीओ व्हायरल केला असता तर अधिक चांगले वाटले असते. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व रुग्णांची विचारपूस केली. जेवण इतर सुविधा व्यवस्थित मिळत आहेत का याची माहिती घेतली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यानंतर प्रशिक्षीत आरोग्य कर्मचाऱ्याप्रमाणे एका व्यक्तीचा स्वॅब जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यांच्या तपासणीनंतर तो निगेटिव्ह आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कौशल्याचे सर्वांनाच कौतुक वाटले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, वैदयकीय अधिक्षक डॉ. दिपक लांडे, तालूका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदीवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी तोटेवाड उपस्थित होते. 

तालूक्यात शनिवारी नऊ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधीतांची संख्या १६२ झाली. ८४ व्यक्तीवर उपचार सुरु आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चार जणांना डिस्चर्ज देण्यात आला.

संपादन-प्रताप अवचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com