उस्मानाबाद जिल्हा अतिदक्षता विभाग सलाईनवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

जिल्हा रुग्णालयात किरकोळ सुविधाही मिळत नसल्याने नाराजी

उस्मानाबाद - जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागच सध्या सलाईनवर आहे, आरोग्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही जिल्हा रुग्णालयात किरकोळ दर्जाच्या सुविधा मिळत नसल्याने रुग्णांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

जिल्हा रुग्णालयात किरकोळ सुविधाही मिळत नसल्याने नाराजी

उस्मानाबाद - जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागच सध्या सलाईनवर आहे, आरोग्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही जिल्हा रुग्णालयात किरकोळ दर्जाच्या सुविधा मिळत नसल्याने रुग्णांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

सर्व सुविधा असणारे शहरातील एकमेव शासकीय रुग्णालय म्हणून जिल्हा रुग्णालयाची ओळख आहे. परंतु, यातील अनेक सुविधा केवळ कागदोपत्री असल्याचा अनुभव रुग्णांना येत आहे. जिल्ह्याच्या विविध तालुक्‍यांतून अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होतात. खासगी रुग्णालयातील सेवा महागड्या असल्याने सामान्य नागरिकांना शासकीय रुग्णालयाचा आधार घेतल्याशिवाय पर्यायही नसतो. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्याचा गाजावाजा आरोग्य प्रशासनाकडून केला जातो. जिल्हा रुग्णालयाला २४ तास वीजपुरवठा करण्याचा आदेश सात- आठ वर्षांपूर्वीच झालेला आहे. 

परंतु, अजूनही शहरातील जिल्हा रुग्णालयाला २४ तास वीजपुरवठा होत नसल्याचे दिसून येत आहे. अपघात झाल्यानंतर अनेक रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागते. काही रुग्णांना कृत्रिम ऑक्‍सिजन पुरवावा लागतो. तशी व्यवस्थाही जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे.

मात्र वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे तातडीने उपचार आवश्‍यक असलेल्या रुग्णांची गैरसोय होत आहे. २४ तास वीज पुरवठा असावा, यासाठी वीजवाहिनीचे वेगळे फिडर आहे. अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर ताबडतोब वीजपुरवठा सुरू होणे अपेक्षित आहे. कर्मचारी रुग्णालयात हजर असेल तर जनरेटर सुरू होते, अन्यथा दोन-तीन तासांनंतरही जनरेटरची व्यवस्था सुरू होत नाही. रुग्णालयातील लिफ्टचीही अशीच स्थिती आहे. ऑटोजनरेटर बॅटऱ्यांअभावी बंद असल्याने कर्मचारी तसेच रुग्ण लिफ्टमध्येच अडकत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कित्येक दिवस लिफ्ट दुरुस्तीअभावी बंदच असते. दर सहा महिन्यांला लिफ्टची सर्व्हिंसंग होणे गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने असे प्रकार होत असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व सुविधा अगदीच किरकोळ आहेत. परंतु, प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. आरोग्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांचेही रुग्णालयातील सुविधांबात दुर्लक्ष होत आहे.

Web Title: The district hospital in the Department of saline