‘या’ जिल्ह्यात कामगार कार्यालयाला बालकामगारच सापडेनात 

शिवचरण वावळे
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

नांदेडः  ज्या वयात शिक्षण घ्यायचे आणि स्वतःचे उज्वल भविष्य घडवायचे अशा बालकांच्या हातात घरातील आर्थिक अडचणींना हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम करण्याची वेळ आल्याचे प्रत्येकाला सर्वत्र दिसून येते. पण आपल्याला काय करायचे, अशी भावना ठेवत प्रत्येक जण ‘झाेपेचे साेंग’ घेेत असल्याचे पहावयास मिळते. असेच काहीसे साेंग किंवा मुग गिळून गप्प राहण्याची भूमिका कामगार कार्यालय घेत असल्याचे दोन वर्षातील आकडेवारीवरून दिसून येते.

नांदेडः  ज्या वयात शिक्षण घ्यायचे आणि स्वतःचे उज्वल भविष्य घडवायचे अशा बालकांच्या हातात घरातील आर्थिक अडचणींना हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम करण्याची वेळ आल्याचे प्रत्येकाला सर्वत्र दिसून येते. पण आपल्याला काय करायचे, अशी भावना ठेवत प्रत्येक जण ‘झाेपेचे साेंग’ घेेत असल्याचे पहावयास मिळते. असेच काहीसे साेंग किंवा मुग गिळून गप्प राहण्याची भूमिका कामगार कार्यालय घेत असल्याचे दोन वर्षातील आकडेवारीवरून दिसून येते. यात जिल्ह्यात दाेन वर्षात केवळ एका बालकामगाराची नोंद झाल्याने जिल्हा बालकामगारमुक्त झाला की काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. 
 

असे म्हटले जाते की, बालकामगार प्रथा ही समाजाला लागलेला कलंक आहे. हा कलंक पुसण्यासाठी बालकामगार प्रथेचे समुळ उच्चाटण करणे ही काळाची गरज आहे. गरिबीमुळे शाळेत न शिकणारी मुले, मुली कामधंदा करून अर्थार्जन करतात. बालवयात त्यांना जोखिमीच्या उद्योग, व्यवसायात कामावर न ठेवता त्यांची शारिरीक व मानसिक वाढ होण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बालकामगार प्रथा निर्मूलन करण्याच्या दिशेने सरकार पावले टाकत आहे. परंतु, गेल्या वर्षभरात एकही बालकामगार शोधुन सापडला नसल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या आकडेवारीमुळे दिसून येत असल्याने अाश्चर्य व्यक्त हाेत आहे. 

जिल्ह्यात शेकडाे बालकामगार सापडतात, पण विभागाचा कानाडाेळा
 
नांदेड जिल्ह्यात विट भट्टी, चहाची टपरी, गॅरेज, बुट पॉलीश, हॉटेल, किराणा दुकान, चप्पल, कापड दुकान सारख्या दुकानात आजही शेकडो बालकामगार सऱ्हासपणे काम करताना सापडतील. पण बालकांना कामावर ठेवणे किंवा त्यांना काम करण्यास प्रवृत्त करणारे दुकानदार किंवा मालकाकडे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आणि महिला व बाल कल्याण विभागाकडून नेहमीच कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे दुकान मालकांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे सहाय्यक कामगार आयुक्त विभागाकडून जिल्ह्यात बालकामगार शोधायला गेले तरी कार्यवाही होणार नाही, अशी नेहमीच भुमिका राहिली आहे. यामुळे बालकामर प्रथेला पाठबळ मिळत आले आहे.

तर हाेईल प्रथेचे समुळ उच्चाटन

बालकामगार प्रथा बंद झाली पाहिजे. त्यांची पिळवणूक थांबली पाहिजे. त्यांचे हरवलेले बालपण त्यांना मिळवून दिले पाहिजे. केवळ चरितार्थ चालत नाही म्हणून बालवयात कामगार म्हणून काम करणाऱ्या मुलांना त्यांचे हरवलेले बालपण परत मिळवून देण्यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेतला जाईल का हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे बालकामगार विरोधी फेरी काढुन एवढ्यावरच न थांबता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आणि महिला व बालकल्याण विभागाकडून बालकामगार प्रथेचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. तेव्हा कुठे शासनाला बालकामगार प्रथेला खिळ बसवण्यात यश येऊ शकेल असे अनेक स्वंयसेवी संघटनेकडून बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In this district, the labor office does not have child labor