संविधान जाळल्याच्या निषेधार्थ जिल्हा वकील संघाचे कामबंद

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

दिल्ली येथे काही अज्ञात समजाकंटकांनी देशाच्या एकात्मतेला हात घातला आहे. देश एकसंघ ठेवणाऱ्या व ज्याच्या आधारे देश चालतो त्या संविधानाच्या प्रती जाळल्या. या देशद्रोह्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे तसेच या षडयंत्रामागे कोण आहे हे तपासून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वकिल संघाने केली आहे.

नांदेड : दिल्ली येथे काही नऊ आॅगस्ट रोजी भारतीय संविधानाच्या प्रतिची काही विघातक समाजद्रोहीनी होळी केली. ही घटना अत्यंत निषेधार्ह असल्याने जिल्हा वकिल संघाच्या वतीने सोमवारी (ता. 13) कामबंद आंदोलन केले. 

दिल्ली येथे काही अज्ञात समजाकंटकांनी देशाच्या एकात्मतेला हात घातला आहे. देश एकसंघ ठेवणाऱ्या व ज्याच्या आधारे देश चालतो त्या संविधानाच्या प्रती जाळल्या. या देशद्रोह्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे तसेच या षडयंत्रामागे कोण आहे हे तपासून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वकिल संघाने केली आहे. या कृत्तीच्या निषेधार्थ जिल्हा वकिल संघाने सोमवारचे काम वाढवून घेतले आहे. अचानक पुकारलेल्या या कामबंदमुळे ग्रामिण भागातून आलेल्या पक्षकार, साक्षिदार यांची चांगलीच तारांबळ उडाली. संघटनेच्या वतीने प्रमुख जिल्हा न्यायाधिश व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर वकिल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड. मिलींद एकताटे, उपाध्यक्ष ॲड. जगजीवन भेदे आणि सचीव ॲड. नितीन कागणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: District Lawyers teams protested against burning the constitution