esakal | मराठवाड्यातील जिल्ह्यांनी कोरोनाचा खर्च कसा केला, हिशेबाला झाली सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

20coronavirus_105_0

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रत्येक जिल्ह्याचा खर्चही वाढत आहे. नोव्हेंबरपर्यंत संभाव्य कोरोना रुग्णवाढ व आवश्यक उपाययोजनांसाठी ४६७ कोटी ९० लाख रुपयांची मागणी केली होती. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (एसडीआरएफ) देण्यात आलेल्या ५३ कोटींपैकी आठ जिल्ह्यांनी ४० कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवला आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांनी कोरोनाचा खर्च कसा केला, हिशेबाला झाली सुरवात

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रत्येक जिल्ह्याचा खर्चही वाढत आहे. नोव्हेंबरपर्यंत संभाव्य कोरोना रुग्णवाढ व आवश्यक उपाययोजनांसाठी ४६७ कोटी ९० लाख रुपयांची मागणी केली होती. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (एसडीआरएफ) देण्यात आलेल्या ५३ कोटींपैकी आठ जिल्ह्यांनी ४० कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवला आहे. जिल्ह्यांना देण्यात आलेल्या निधीचा विनियोग कसा झाला याबाबतचा हिशेब करण्यास सुरवात झाली आहे.

जायकवाडी धरणाच्या १२ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरु, नागरिकांना सर्तकतेचा...

मार्च-एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाचा फैलाव सुरू झाला असताना प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन निधीतून तत्काळ बाब म्हणून निधी देण्यात आला होता. याच कालावधीत एसडीआरएफ फंडातूनही मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांच्या मागणीनंतर ५२ कोटी ५० लाख रुपये देण्यात आले होते. यापैकी कोरोना उपाययोजनांसाठी ऑगस्ट अखेर ४० कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असा अहवाल त्या-त्या जिल्ह्यांनी पाठवला आहे.

कोविड केअर सेंटरवर खर्च
पहिल्या टप्प्यामध्ये सर्वाधिक १६ कोटी ५० लाख रुपये औरंगाबाद जिल्ह्याला देण्यात आले होते. आठही जिल्ह्यांना देण्यात आलेला हा खर्च प्रामुख्याने कोविड केअर सेंटरची उभारणी तसेच तेथे आवश्यक असलेल्या उपाययोजनांसाठी खर्च करण्यात आला. आता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून नव्याने एसडीआरएफ फंडातून निधी देण्यासंदर्भातील मागणी करण्यात आली आहे. कोरोना संकटामुळे यावर्षी राज्य सरकारने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील डीपीसीच्या १५१३ कोटी रुपयांच्या निधीला कात्री लावली असून यावर्षी केवळ ६६३ कोटी रुपयेच मराठवाड्याच्या वाट्याला मिळणार आहेत. या ६६३ कोटी पैकी २५ टक्के म्हणजे १६५ कोटी रुपये कोविड उपाययोजनांसाठी खर्च करण्याचे नियोजन आहे.
 

मुसळधार पावसाने औरंगाबाद शहरात दाणादाण, अनेक वस्त्यांमध्ये शिरले पाणी

कोविडसाठी एसडीआरएफमधून देण्यात आलेला निधी

जिल्हे------------------------- निधी
औरंगाबाद-----------------१५ कोटी ५० लाख
जालना--------------------५ कोटी
परभणी ----------------- ५ कोटी २५ लाख
हिंगोली---------------------५ कोटी १० लाख
नांदेड---------------------५ कोटी १५ लाख
बीड ------------------------५ कोटी १० लाख
लातूर -----------------------७ कोटी ४० लाख
उस्मानाबाद------------------३ कोटी
एकूण------------------------५२ कोटी ५० लाख


(संपादन - गणेश पिटेकर)