esakal | परभणी : बारावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल 84.66 टक्के
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या वर्षी पुन्हा एकदा निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 91.15 टक्के तर मुलांच्या  80.43 टक्के आहे.

परभणी : बारावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल 84.66 टक्के

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता.16) जाहिर झाला असून जिल्ह्याच्या एकूण निकालाची टक्केवारी 84.66 टक्के आहे. या वर्षी पुन्हा एकदा निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 91.15 टक्के तर मुलांच्या  80.43 टक्के आहे.

जिल्ह्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एमसीव्हीसी शाखेच्या 23 हजार 134 नियमित विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. तर 22 हजार 849  विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी 19 हजार 345 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची ही टक्केवारी 84.66 टक्के आहे.या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली.  नऊ हजार 26 मुलींनी ही परीक्षा दिली त्यापैकी आठ हजार 227 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या. ही टक्केवारी 91.15 टक्के आहे. तर 13 हजार 823 मुलांपैकी 11 हजार 118 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी 80.43 टक्के आहे.

हेही वाचानांदेड जिल्हा आरोग्य विभागाचा असाही कारभार, स्वॅब अहवालास प्रचंड विलंब

विज्ञान शाखेचा निकाल 92 टक्के

या परीक्षेत सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा लागला. नऊ हजार 55 पैकी आठ हजार 349 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

ही टक्केवारी 92.20 टक्के आहे. त्यामध्ये विशेषप्राप्त 460, प्रथमश्रेणी तीन हजार 125, द्वितीय क्षेणी चार हजार 564, पासश्रेणीत 200 विद्यार्थी उत्तीर्णझाले. कला शाखेच्या 10 हजार 694 पैकी आठ हजार 245 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी 77.10 टक्के आहे.  विशेषप्राविण्य प्राप्त 639 विद्यार्थी अशून तीन हजार 731 जणांनी प्रथम, तीन हजार 652 जणांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली. 223 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.  वाणिज्य शाखेचा निकाल 91.51 टक्के लागला. दोन हजार 531 पैकी दोन हजार 316 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये विशेष प्राविण्यप्राप्त 497, प्रथमश्रेणी 974, द्वितीय श्रेणी 815 तर तृतीय श्रेणीतील 30 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

एमसीव्हीसी अभ्यासक्रमाचे 569 पैकी 435 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आठ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, प्रथमश्रेणीत 264, द्वितीय श्रेणीत 163 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तालुक्यात सेलूचा निकाल सर्वाधिक

जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये सेलू तालुक्याने सर्वाधिक  89.79 टक्के निकाल दिली. गंगाखेड (87.65), पाथरी

(85.15), परभणी (85.39),  पालम (84.68), जि्ंतुर (84.00), मानवत (80.65), सोनपेठ (79.00) व पुर्णा तालुक्याचा 78.6 टक्के निकाल लागला.

संपादन- प्रल्हाद कांबळे