अध्यक्ष बनविण्याच्या चाव्या सेनेच्या हातात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

लातूर - लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने 39 उमेदवार दिले आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याची चावी शिवसेनेच्या हातात असेल असा विश्‍वास शिवसेनेचे नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी येथे सोमवारी (ता. 13) पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

लातूर - लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने 39 उमेदवार दिले आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याची चावी शिवसेनेच्या हातात असेल असा विश्‍वास शिवसेनेचे नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी येथे सोमवारी (ता. 13) पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिली होती. जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व कमी आहे; पण संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यामुळे जिल्ह्यात शिवसेना दिसू लागली आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच स्वबळावर शिवसेना जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहे. आम्हाला विजय निश्‍चित मिळेल. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याची चावी आमच्या हातात असेल असे श्री. रावते म्हणाले. 

शिवसेना हा पक्ष फिक्‍सिंग करणारा पक्ष आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. 12) येथे केली होती. यावर आमची कोणासोबतही फिक्‍सिंग नाही. आमचे जे काही असते ते समोर असते. भाजपसारखे इतरांनी टाकून दिलेले उमेदवार आम्ही घेऊन त्यांना उमेदवारी दिलेली नाही. लातूर जिल्ह्यात आम्ही केवळ 39 च उमेदवार दिले आहेत. त्यामुळे फिक्‍सिंगचा प्रश्‍नच येत नाही, असे श्री. रावते म्हणाले. या वेळी संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख ऍड. बळवंत जाधव, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, रवी सुडे, सुनीता चाळक उपस्थित होत्या. 

सरकार आमच्या पाठिंब्यावर 
राज्यात भाजप व शिवसेना यांच्यात युती नाही. आम्ही सत्तेत सहभागी असलो तरी सरकार आमच्या पाठिंब्यावर टिकून आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससारखे आम्ही बाहेर पाठिंबा देण्याची नौटंकी करीत नाही. आमचे राजीनामे तयार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्यावेळेस सांगतील त्या वेळेस राजीनामे दिले जातील असे श्री. रावते म्हणाले. 

Web Title: divakar raote in latur