औरंगाबाद दंगल पूर्वनियोजित : रावते

मधुकर कांबळे
शनिवार, 26 मे 2018

शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी आज दंगलग्रस्त राजा बाजार, जिन्सी या भागांना सकाळी साडेदहा अकरा वाजेच्या सुमारास भेटी दिल्या . त्यांनी या दंगलीत मरण  पावलेले बन्सिले  यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दंगलीमध्ये सर्वस्व गमावलेल्या शर्मा कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

औरंगाबाद : औरंगाबाद येथे झालेली दंगल ही अतिशय भीषण आणि पूर्वनियोजित असल्याचे या भागात पाहणी केल्यानंतर निदर्शनास आले. ही दंगल जात्यंध लोकांनी केलेले नियोजित कटकारस्थान असून ही अतिशय गंभीर घटना आहे. येत्या मंगळवारी यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे शिवसेनेचे नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी (ता.26 ) औरंगाबाद येथे बोलताना सांगितले. 

शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी आज दंगलग्रस्त राजा बाजार, जिन्सी या भागांना सकाळी साडेदहा अकरा वाजेच्या सुमारास भेटी दिल्या . त्यांनी या दंगलीत मरण  पावलेले बन्सिले  यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दंगलीमध्ये सर्वस्व गमावलेल्या शर्मा कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या यानंतर शिवाजीनगर येथे जाऊन सद्या अटकेत असलेले शिवसेनेचे राजेंद्र राजेंद्र जंजाळ आणि नंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या.

या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले प्रदीप जयस्वाल हे वर्षानुवर्ष पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करतात. शांतता निर्माण करतात, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची त्यातून मार्ग काढतात हे पोलीस खात्याला देखील माहित आहे. याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख यांनी देखील लक्ष घातले आहे घातले असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Divakar Raote talked about Aurangabad riot