लातूरच्या संस्थाचालकाला खंडपीठाचा दणका 

सुषेन जाधव
शनिवार, 14 जुलै 2018

विनावेतन सेवा बजाविणाऱ्या लातूर येथील शिक्षिकेने खंडपीठात धाव घेतली असता संस्थाचालकाला चार आठवड्यांत पाच लाख रुपये जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस. के. कोतवाल यांच्या खंडपीठाने दिला. सदर रक्कम जमा न केल्यास पुढील कारवाईचा इशाराही देण्यात आला. 

औरंगाबाद : विनावेतन सेवा बजाविणाऱ्या लातूर येथील शिक्षिकेने खंडपीठात धाव घेतली असता संस्थाचालकाला चार आठवड्यांत पाच लाख रुपये जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस. के. कोतवाल यांच्या खंडपीठाने दिला. सदर रक्कम जमा न केल्यास पुढील कारवाईचा इशाराही देण्यात आला. 

याचिकाकर्त्या फातेमा उस्मानखॉं पठाण यांची 20 सप्टेंबर 2003 ला लातूर येथील सखाराम पाटील प्राथमिक विद्यालयात नियुक्ती करण्यात आली. सुरवातीला शाळा विनाअनुदान तत्त्वावर सुरू होती. त्यानंतर 2010 साली संस्थेला अनुदान प्राप्त झाले. दरम्यान, संस्थेने त्यांच्या मान्यतेचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे न पाठविल्याने त्यांनी अॅड. रामराव बिरादार यांच्यामार्फत याचिका दाखल केली.

यापूर्वी उपसंचालकांनी प्रकरणात खंडपीठात अहवाल सादर केला. त्यानंतर 2003 सालापासून याचिकाकर्ती विनावेतन काम करीत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सुनावणीअंती खंडपीठाने संस्थाचालकाला चार आठवड्यांत पाच लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले. 

Web Title: A division bench of Latur Fined