विभागीय आयुक्‍तांनी साधला ऊसउत्पादक शेतकऱ्यांशी संवाद

जायकवाडी : शेतकऱ्यांशी चर्चा करताना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर.
जायकवाडी : शेतकऱ्यांशी चर्चा करताना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर.

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पैठण तालुक्‍यात अचानक दौरा करून कातपूर, करंजखेडा, रहाटगाव, आखातवाडा येथील शेतातील बांधांवर भरपावसात जाऊन ऊसउत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केली.
गुरुवारी (ता. 12) पैठण तालुक्‍यातील विविध गावांमध्ये विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व पिकांची पाहणी केली.

यात प्रामुख्याने तालुक्‍यातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत सध्या शेतकरी वापरत असलेली ऊस पाणी व्यवस्थापन पद्धत आणि शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विविध समस्यांविषयी त्यांनी माहिती घेतली. यावेळी उपायुक्त श्री. बोथरा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे उपस्थित होते. पैठण तालुक्‍यातील कातपूर, करंजखेडा, रहाटगाव, आखातवाडा येथील ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात विभागीय आयुक्तांनी भरपावसात भेटी देऊन विविध अवस्थांमधील ऊस पिकाची पाहणी केली. यावेळी ऊसउत्पादक शेतकरी सध्या वापरत असलेल्या पाणी व्यवस्थापन पद्धती, त्यापासून मिळणारे उत्पादन व उत्पन्न, तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्या याविषयी शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.


यावेळी तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, मंडळ कृषी अधिकारी विशाल साळवे, रामनाथ कारले, कृषी पर्यवेक्षक वसंत कातबने, किशोर पाडळे, यशवंत चौधरी, भागचंद लघाने, राजू गावडे, सचिन खराद, सचिन निवारे, कृषी सहायक मनीषा पवार, रजनी पवार, सुवर्णा अकोलकर, जयश्री पिंपरिया, संतोष भागवत, विकास वाघमारे, तसेच शेतकरी देवीचंद मोरे, गोकुळ रोडी, ज्ञानेश्वर मस्के, दीपक मोरे, योगेश जाधव, बाबासाहेब भुजबळ, दादासाहेब बर्डे, निवृत्ती रोडी यांच्यासह चारही गावांमधील ऊसउत्पादक शेतकरी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी भरपावसात चप्पल न घालता चिखल तुडवत थेट शेतातील बांधावर भरपावसात जाऊन ऊस, मका, मोसंबीसह कातपूर येथील शेतकरी दीपक मोरे यांच्या पशुधन व दुग्धव्यवसायाची पाहणी केली. केंद्रेकर यांनी कातपूर फाट्याजवळील एका छोट्या चहा स्टॉलवर भरपावसात शेतकऱ्यांसह गुळाचा चहाही घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com