आदर्श किनगावात दारू व डीजेवर बंदी; महिलांचा पुढाकार

आदर्श किनगावात दारू व डीजेवर बंदी; महिलांचा पुढाकार

फुलंब्री : तालुक्यातील आदर्श गाव किनगावात दारू व डिजे शंभर टक्के बंद करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन विशेष ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर केला. दारू बंदीसाठी महिलांनी जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व सरपंच पांडुरंग नजन यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन रविवारी (ता.25) करण्यात आले.

या ग्रामसभेसाठी किनगावचे सुपुत्र तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांची खास विशेष उपस्थिती होती. दारूमुळे अनेकांचे संसार आज उध्वस्त झालेले आहे. तर अनेकांचे कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. दारू पिण्याची सवय जरी माणसांना असली तरी त्याची झळ घराघरातील महिलांना सोसावी लागत आहे. त्यामुळे दारू बंदी झालीच पाहिजे यासाठी गावातील महिलांनी जिल्हा परिषद सदस्य अनुराधा अतुल चव्हाण यांच्याकडे समस्यांचा पाढा वाचला. त्यानंतर अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांनी एकत्र येऊन दारू व डीजे बंदीसाठी विशेष ग्रामसभा बोलविण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केली. त्यामुळे सरपंच पांडुरंग नजन, उपसरपंच कल्याण चव्हाण व ग्रामसेवक अरुण चित्ते यांनी विशेष ग्रामसभेचे रविवारी आयोजन केले होते. या ग्रामसभेत महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. तसेच दारूमूळे उद्भवणाऱ्या समस्या महिलांनी ग्रामसभेत मांडल्या. ग्रामसभेत दारूबंदी झालीच पाहिजे असा ठराव करीत येथील महिला व पुरुषांनी जोर धरला. तसेच महिलांनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराचे प्रसंग सांगितल्याने किनगावात बाटली आडवी करण्यासाठी महिलांनी चांगलीच कंबर कसली आहे.

आदर्श किनगावात आणखी एक आदर्श करून व्यसनमुक्त करायचे तसेच गावात शंभर टक्के दारू बंदी झालीच पाहिजे असा ठराव ग्रामसभेत बहुमताने संमत करण्यात आला. या ठरावाच्या प्रती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे  ग्रामपंचायतीचे उपसरपंच कल्याण चव्हाण यांनी यावेळी सांगितले. या ग्रामसभेत काही लोकांनी स्वतः समोर येऊन मी दारू सोडली अशी शपथ घेतली. तसेच दारूबंदी गांव व दारूमुक्त शिवार करण्याचा मनाशी गुणगाठ अनुराधा चव्हाण यानी बांधली होती. वृक्ष लागवड, ग्रामस्वच्छतेची शपथ, महिला विषयक उपक्रम व इतर विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी आपासाहेब देवकर, विनोद सोनवणे, आशा सोनवणे, सचिन चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष चव्हाण, सजन  चव्हाण, तेजराव चव्हाण, देवनाथ सोनवणे,भाऊसाहेब चव्हाण, सुदाम चव्हाण, सुभद्रा किशोर चव्हाण, संतोष चव्हाण, रामेश्वर  सोनवणे, साहेबराव सोनवणे, आप्पासाहेब सोनवणे, अनंत सोनवणे, सचिन जैन चव्हाण,  बाळासाहेब शिंदे, अमोल सोनवणे, अमोल चव्हाण, स्वप्निल चव्हाण, चेतन जैन, गणेश सोनवणे, राहुल सोनवणे, संतोष चव्हाण, शुभम चव्हाण आदीची मोठ्या संख्येने उपस्तिती होती.

ग्रामस्थ प्रशासनाला मदत करणार
गावात कोणी दारू विक्री केली तर त्यासंदर्भातील सर्व माहिती पोलिसांना देण्यात येणार आहे. तसेच दारु विक्रेत्याच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील. गावात शांतता, सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने ग्रामसभा, ग्रामपंचायती सक्षम व्हाव्यात या हेतूने उपक्रम राबविले जातील. कायद्याची अमंलबजावणी करण्यासाठी प्रबोधनाचे काम ग्रामस्थ आगामी काळात करणार आहे. गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करुन कायदा व सुव्यस्थेसाठी प्रशासनाला मदत करण्यात येणार आहे. 

आदर्श गाव किनगावाला महाराष्ट्रात एक वेगळे नावलौकिक मिळण्यासाठी ग्रामस्थानाच्या माध्यमातून अनेक आगळेवेगळे उपक्रम राबविले जात आहे. आज विशेष ग्रामसभा बोलावून दारू बंदी व डिजेबंदीचा ठराव ग्रामस्थांनी एकमताने घेतल्यामुळे मी किनगावकर असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. 
- अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com